

पुढारी ऑनलाईन डेस्क : आभासी वास्तवाच्या दुनियेत सामूहिक बलात्काराचे पहिले आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ऑनलाइन 'मेटाव्हर्स'मध्ये १६ वर्षीय तरुणीवर 'लैंगिक अत्याचार' झाल्याच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. ब्रिटन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या गुन्ह्याचा तपास पोलीस पहिल्यांदा करणार आहेत.
'द न्यूयॉर्क'च्या रिपोर्टनुसार, मुलीच्या डिजिटल कॅरेक्टरवर अनोळखी व्यक्तींने ऑनलाइन सामूहिक बलात्कार केल्याचे म्हटले आहे. या घटनेने पीडित मुलगी अस्वस्थ झाली आहे. .
या प्रकरणाच्या अहवालात म्हटले आहे की, मुलीने (म्हणजे तिचा डिजिटल अवतार) एका इमर्सिव्ह गेममध्ये व्हर्च्युअल रिअॲलिटी हेडसेट घातला होता. यावेळी तिच्यावर एका पुरुष गटाने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणात पीडित मुलीला कोणतीही शारीरिक दुखापत झाली नसली तरी, तपास अधिकार्यांनी सांगितले आहे की, "वास्तविक जगात" बलात्कार झालेल्या कोणत्याही महिलेवर भावनिक आणि मानसिक आघात होतात. हा मानसिक त्रास तिला भोगावा लागत असतो. पोलिसांनी तपास केलेला हा पहिला आभासी लैंगिक गुन्हा असल्याचे मानले जात आहे.
या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'न्यूज आउटलेट'ला सांगितले की, "पीडित मुलीला शारीरिकरित्या बलात्कार झालेल्या व्यक्तीप्रमाणेच मानसिक आघात झाला आहे. पीडितेवर होणारा भावनिक आणि मानसिक परिणाम कोणत्याही शारीरिक दुखापतीपेक्षा जास्त काळ टिकतो. या प्रकारचे प्रकरण कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींसाठी अनेक आव्हाने उभी करतात कारण त्यासाठी अद्यापही कोणतेही कायदे तयार केलेले नाहीत."
या प्रकरणावर बाेलताना मेटा कंपनीने म्हटले आहे की, Horizon Worlds मध्ये व्हर्च्युअल लैंगिक गुन्ह्यांचे अनेक प्रकरणे आली आहेत. Facebook ची मूळ कंपनी Meta द्वारे संचालित एक विनामूल्य VR गेम सेवा सुविधा उपलब्ध आहे. मेटाच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, "वर्णन केलेल्या वर्तनाला आमच्या प्लॅटफॉर्मवर स्थान नाही, म्हणूनच आमच्याकडे सर्व वापरकर्त्यांसाठी स्वयंचलित संरक्षण आहे, ज्याला वैयक्तिक सीमा म्हणतात. अशा लोकांना एखाद्या व्यक्तीसोबत अनधिकृत वर्तन करण्यापासून निर्बंध घालते. युजर्स अशा सुरक्षेचा वापर करुन स्वत:चे संरक्षण करु शकतात."
हेही वाचा