Satya Nadella | मायक्रोसॉफ्टचे सत्या नादेला ठरले सर्वोत्कृष्ट CEO; एआयमधील योगदानाची दखल

Satya Nadella | मायक्रोसॉफ्टचे सत्या नादेला ठरले सर्वोत्कृष्ट CEO; एआयमधील योगदानाची दखल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मूळचे भारतीय असलेले मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नादेला या वर्षीचे सर्वोत्कृष्ट सीईओ ठरले आहे. सीएनएन बिझनेसने त्यांना हा पुरस्कार दिला आहे. मायक्रोसॉफ्टने ज्या पद्धतीने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर स्वतःची छाप सोडली आहे, आणि अत्यंत बिकट परिस्थिती निर्णय घेतले हे लक्षात घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. (Satya Nadella)

२०२३ला सत्या नादेला यांनी एआयमध्ये मोठी गुंतवणूक केली तसेच स्पर्धकांना मागे टाकत एआयचा व्यावसायिक वापरही सुरू केला, असे सीएनएनने म्हटले आहे. सत्या नादेला यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा कंपनीने नवनिर्मितीत आघाडी घेतली असून कंपनीचे शेअर जवळपास ५५ टक्केंनी वधारले आहेत, असेही सीएनएनने म्हटले आहे.

AI वर मोठा प्रभाव

सीएनएन बिझनेसच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी चेस कंपनीचे सीईओ जॅमी डायमॉन, ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन आणि निव्हिडियाचे सीईओ जेन्सन युवांग स्पर्धेत होते. २०२३पासून एआयवर नादेलांच्या निर्णयांचा फार मोठा परिणाम झाल्याचे दिसते, एआयची दिशा ठरवण्यात आणि नवनिर्मितीला चालना देण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. (Satya Nadella)

सत्य नादेला यांनी सीएनएनला पाठवलेल्या इमेलमध्ये म्हटले आहे की, "2023 हे वर्ष एआयचे होते, यात काहीच शंका नाही. एआय ही फक्त कल्पना नसून त्याचा प्रत्यक्षात वापरही सुरू झाला. नवनर्मितीने शेवटी आपल्याला करिअरमध्ये, समुदायात प्रबळ करणे अपेक्षित असते."

कॉर्पोरेट जगताला आरसा दाखवणारा पुरस्कार

२०१८पासून सीएनएन बिझनेस हा पुरस्कार देते. हा पुरस्कार देत असताना एखाद्या सीईओची इतरांशी तुलना करण्याचा आमचा हेतू नसतो, आम्ही फक्त अमेरिकेच्या कॉर्पोरेट जगताला आरसा दाखवतो आणि आम्हाला जे दिसते ते दाखवण्याचा प्रयत्न करतो, असे सीएनएन बिझनेसने म्हटले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news