पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनच्या गान्सू प्रांतात सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. चीनमधील भूकंपात ११६ लोक मृत्यूमुखी पडले असून ४०० हून अधिक जखमी झाले आहेत. त्यामुळे चीनमध्ये हाहाकार उडाला. या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल नोंदवली गेली आहे.
आज सकाळी चीनमध्ये ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली असून मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे चीनमधील सरकारची धांदल उडाली आहे. या भूकंपात आतापर्यंत ११६ लोकांचा मृत्यू आणि ४०० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हा भूकंप ३५ किमी खोलीवर झाला असून त्याचा केंद्रबिंदू गान्सूची प्रांतीय राजधानी शहर, लान्झोऊच्या पश्चिम-नैऋत्येला १०२ किमी अंतरावर आहे.
गान्सूच्या प्रांतीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने सांगितले की, भूकंपाची तीव्रता इतकी होती की अनेक इमारती कोसळल्या. भूकंपामुळे सर्वात जास्त नुकसान काउंटी, डियाओजी आणि किंघाई प्रांतात झाले आहे. येथे अनेक इमारती कोसळल्यामुळे लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत, त्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मृत आणि जखमींची संख्या वाढू शकते.
हेही वाचा :