पुढारी ऑनलाईन : फेसबुकवरून भेटलेल्या पाकिस्तानी मित्राशी लग्न करुन संसार थाटलेल्या अंजू उर्फ फातिमा (anju fatima pakistan) तिच्या मुलांना भेटण्यासाठी अटारी सीमेमार्गे पुन्हा भारतात परतली आहे. दोन मुलांची आई असलेली ३४ वर्षीय अंजू तिचा फेसबुकवरील मित्र नसरुल्ला याच्याशी लग्न करण्यासाठी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा (केपीके) प्रांतातील एका दुर्गम गावात गेली होती. ती तिच्या मुलांना भारतातच सोडून गेली होती. पण ती आता पाकिस्तानातून भारतात परतली आहे. बुधवारी ती अटारी सीमेमार्गे तिच्या मुलांना भेटण्यासाठी आली. (Anju Pakistan News)
संबंधित बातम्या
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजूचा जन्म उत्तर प्रदेशातील कैलोर गावात झाला होता. तर ती राजस्थानच्या अलवरमध्ये राहात होती. ती बुधवारी दुपारी वाघा (पाकिस्तान)/अटारी (भारत) सीमेमार्गे आली. "ती एकटीच परतली आहे. तिच्याकडे काही थोडेच सामान होते आणि ती शांत दिसून आली." एका सूत्राने पुढे सांगितले की ती अमृतसरहून दिल्लीला रवाना होणार आहे. (anju pakistan latest news)
एका वृत्तानुसार, अंजू आणि नसरुल्ला यांची २०१९ पासून फेसबुकच्या माध्यमातून मैत्री होती. २५ जुलै रोजी अंजूने खैबर पख्तूनख्वा येथील अप्पर डीर जिल्ह्यात राहणाऱ्या २९ वर्षीय नसरुल्लासोबत लग्न केले आणि तिने इस्लाम धर्माचा स्वीकार केला. तिचे नाव फातिमा ठेवण्यात आले होते. (anju return from pakistan)
ती भारतातून अटारी सीमेवरून पाकिस्तानात गेली होती. नसरुल्लाहने दिलेल्या माहितीच्या आधारे पाक मीडियाच्या वृत्तानुसार, अंजू उर्फ फातिमा तिची मुलगी आणि मुलग्याला भेटल्यानंतर परत येणार आहे. त्यासाठी पाकिस्तान सरकारने तिचा व्हिसा आधीच एक वर्षासाठी वाढवला आहे. (Anju Pakistan News)
अटारी आंतरराष्ट्रीय सीमेवरील इंटिग्रेटेड चेक पोस्ट सोडल्यानंतर अंजूने चेहऱ्यावर मास्क घातला होता. ती यावेळी खूप शांत दिसून आली. तिला विचारले असता ती म्हणाली, "मी आनंदी आहे, मी आणखी काही बोलू शकत नाही". दरम्यान, येथील गुप्तचर सूत्रांनी अंजूच्या पाकिस्तानात परतण्याबाबत भिती व्यक्त केली आहे.