Khalistan terrorist Pannun | १३ डिसेंबरपूर्वी संसदेवर हल्ला करणार, पन्नूची धमकी, व्हिडिओत अफजल गुरुचा फोटो

Khalistan terrorist Pannun | १३ डिसेंबरपूर्वी संसदेवर हल्ला करणार, पन्नूची धमकी, व्हिडिओत अफजल गुरुचा फोटो
Published on
Updated on

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने आता काश्मीर दहशतवादाला स्वतःशी जोडले आहे. अफझल गुरूच्या स्मरणार्थ 13 डिसेंबर रोजी भारतीय संसदेचा पाया आम्ही हादरवून सोडू, अशी धमकी त्याने दिली आहे. (Khalistan terrorist Pannun)

पन्नूने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये तो म्हणतो, मोदी सरकारने अमेरिकेत माझी हत्या करण्याचा कट रचला. आता आम्ही 13 डिसेंबरला त्याचा जो बदला घेऊ, त्याचा मुकाबला करण्याची भारताची तयारी आहे काय? 13 डिसेंबर 2001 रोजी अफझल गुरूने संसदेत हाहाकार घडवून आणला होता. आता 13 डिसेंबर 2023 रोजी पन्नू त्याच्या हत्येचा कट रचल्याबद्दल भारताचा सूड घेणार आहे.

काश्मीरमधील दहशतवाद्यांनी माझ्यासोबत यावे, असे आवाहनही या व्हिडीओतून पन्नूने केले आहे.

अमेरिका स्थित खलिस्तानी समर्थक दहशतवादी आणि शिख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. त्याने एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात त्याने १३ डिसेंबर रोजी अथवा त्यापूर्वी संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. १३ डिसेंबर रोजीच्या दिवशी २००१ मध्ये संसदेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

अमेरिका आणि कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व असलेल्या पन्नूने २०१३ मध्ये फाशी देण्यात आलेला संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरूच्या फोटोसह एक पोस्टर असलेला व्हिडिओ जारी केला आहे, ज्यात "दिल्ली बनेगा खलिस्तान" असे कॅप्शन दिले आहे. (Khalistan terrorist Pannun)

पन्नूचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहे. भारतीय सुरक्षा एजन्सी आणि दिल्ली पोलिसांनी शिख फॉर जस्टिस समर्थकांचा असा कोणताही कट हाणून पाडण्यासाठी नवी दिल्ली जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा वाढवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news