Mount Merapi Volcano : इंडोनेशियाच्या ज्वालामुखी उद्रेकातील मृतांचा आकडा वाढला, २२ गिर्यारोहकांचे मृतदेह सापडले | पुढारी

Mount Merapi Volcano : इंडोनेशियाच्या ज्वालामुखी उद्रेकातील मृतांचा आकडा वाढला, २२ गिर्यारोहकांचे मृतदेह सापडले

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडोनेशियातील पश्चिम सुमात्रा येथील माऊंट मेरापी ज्वालामुखीच्या उद्रेकातील मृत्यूंच्या आकड्यात आज (दि. ५) वाढ झाली आहे. मदत आणि बचाव पथकांनी गिर्यारोहकांचे मृतदेह बाहेर काढत आहेत. आतापर्यंत २२ जणांचे मतदेह सापडल्याची माहिती एफपीने दिली आहे. (Mount Merapi Volcano)

इंडोनेशियन बचाव कर्मचार्‍यांनी मंगळवारी (दि. ५) मारापी पर्वताच्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर आणखी मृतदेह बाहेर काढले. मृतांचा आकडा २२ पर्यंत वाढल्याची माहिती बचाव पथकाने दिल्याचे वृत्त एफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे. सुमात्रा प्रांताचे पोलीस प्रमुख एडी मार्डियान्टो यांनी सांगितले की, स्फोटाच्या ठिकाणापासून काही मीटर अंतरावर मृतदेह सापडले आहेत.

अडकलेले लोक वाचणार नाहीत याची भीती

इंडोनेशिया (Indonesia) मधील माऊंट मेरापी ज्‍वालामुखी (Mount Merapi Volcano) चा शनिवारी (दि. २) उद्रेक झाला. हा उद्रेक इतका मोठा होता की, या उद्रेकातून निर्माण झालेले गरम राखेचे ढग तब्‍बल ७ किमी पर्यंतच्या उंचीवर पोहोचले. दरम्यान हायकिंग करण्यासाठी गेलेले ७५ गिर्यारोहक याठिकाणी अडकले. रविवारी यातील ११ गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याची माहिती बचाव पथकाने दिली होती. तसेच ४० हून अधिक गिर्यारोहकांना वाचवण्यात यश आल्याचे देखील सांगण्यात आले होते. आज

हेही वाचा

Back to top button