‘गाझा मुलांसाठी स्मशानभूमी बनत आहे : UN सरचिटणीसांनी पुन्हा दिला इशारा

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस.

पुढारी ऑनलाइंन डेस्‍क : इस्रायल आणि हमास यांच्यात महिनाभरापासून युद्ध सुरू आहे. हा संघर्ष दिवसोंदिवस अधिक चिघळत चालल्‍याचे दिसत आहे. आतापर्यंत १० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या संघर्षामुळे गाझा पट्टीची स्थिती बिकट होत चालली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गाझामधील बिघडलेल्या परिस्थितीबाबत पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

युद्धविरामाची गरज अधिक

अँटोनियो गुटेरेस गुटेरेस यांनी न्यूयॉर्कमध्ये माध्‍यमांशी संवाद साधताना सांगितले की, गाझातील परिस्थिती खूपच वाईट आहे. हे मानवतेवरील संकट आहे. युद्धविरामाची गरज अधिक निकड होत चालली आहे. हा अमानवी त्रास थांबवणे आणि गाझाला मानवतावादी मदतीचा विस्तार करणे ही आंतरराष्ट्रीय समुदायाची जबाबदारी आहे.

गाझामध्‍ये आतापर्यंत यूएनचे ८९ कर्मचारी ठार

एक महिन्यापूर्वी इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून यूएन रिलीफ अँड वर्क एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रिफ्युजीज (UNRWA) साठी काम करणारे ८९ लोक आतापर्यंत या संघर्षात ठार झघले आहेत, अशी माहिती गुटेरेस यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरुन दिली होती.


हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news