Pro-Palestinian Rally in Turkey: तुर्कीमधील अमेरिकन विमान तळावर पॅलेस्टिनी समर्थकांचा हल्ला | पुढारी

Pro-Palestinian Rally in Turkey: तुर्कीमधील अमेरिकन विमान तळावर पॅलेस्टिनी समर्थकांचा हल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क: हमास इस्रायल संघर्ष अधिक तीव्र हाेत आहे. या युद्धात आतापर्यंत सुमारे ११ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृतांची संख्या गाझा पट्टीत आहे. गाझा पट्टीत मानवीय संकट गंभीर होत आहे. यामुळे तुर्कीकडून इस्रायलवर प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, तुर्कीतील पॅलेस्टिनी समर्थकांनी अमेरिकन विमानतळावर हल्ला केल्‍याची घटना घडली आहे. (Pro-Palestinian Rally in Turkey)

 गाझा शहरावर हवाई हल्ल्यासोबत जमीनीवरील कारवाई देखील इस्रायलकडून जोरदार सुरू आहे. इस्रायली लष्कराने हमासच्या प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा करण्याचा संकल्प केला आहे. अमेरिका इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे जगभरातील पॅलेस्टिनी समर्थकांकडून याविरोधात तीव्र आंदोलने होत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन गाझा संदर्भातील चर्चेसाठी तुर्कीची राजधानी अंकारा येथे पोहोचणार होते. मात्र काही तास आधी येथील पॅलेस्टिनी समर्थक दहशतवाद्यांनी रविवारी अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. (Pro-Palestinian Rally in Turkey)

Pro-Palestinian Rally in Turkey: पॅलेस्टिनी समर्थकांनी पोलिसांना केले लक्ष्य

तुर्की येथील अमेरिकन विमान तळावर पॅलेस्टिनी समर्थकांचा जमलेला जमाव पॅलेस्टिनी झेंडे फडकवताना आणि पॅलेस्टिनी घोषणाबाजी करताना दिसला. दरम्यान, पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्सही या जमावाने उद्ध्वस्त केले. या वेळी पोलिस अन् समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली. याशिवाय आंदोलकांनी पोलिसांवर प्लास्टिकच्या खुर्च्या, दगड आणि इतर वस्तूही फेकत पोलिसांनाच लक्ष्य केले. या हिंसक घटनेनंतर तुर्की पोलिसांनी तात्काळ कारवाई करत, अनेक पॅलेस्टिनींना ताब्यात घेतले. दरम्यान, अश्रूधुराचा आणि पाण्याच्या तोफांचा वापर करून आंदोलकांना पांगवले. या हल्‍ल्‍यामुळे परीसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.

हेही वाचा :

 

Back to top button