शेजारी बंगलादेशात हिंसाचाराचा आगडोंब; २ ठार; विरोधी नेत्यांना तुरुंगात डांबले | Violence in Bangladesh

शेजारी बंगलादेशात हिंसाचाराचा आगडोंब; २ ठार; विरोधी नेत्यांना तुरुंगात डांबले | Violence in Bangladesh
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेजारी बंगलादेशात जानेवारीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होता आहेत. निवडणुकांच्या तोंडावर बंगलादेशात विरोधी पक्षांच्या रॅली मिरवणुका देशभर सुरू आहेत. पण याला हिंसक वळण लागले असून देशभारातील विरोधी नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. Violence in Bangladesh

बंगलादेशात बंगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी हा पक्ष प्रमुख विरोधीपक्ष म्हणून पुढे आला आहे. या पक्षाने शनिवारी देशभरात निदर्शने आयोजित केली होती. या निदर्शनांना हिंसक वळण लागले असून यात दोन लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सरकारने अटक केली आहे.

पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी | Violence in Bangladesh

निवडणुकांपूर्वी पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा द्यावा, आणि तटस्थ सरकारच्या निगराणीत निवडणुका घ्यावेत, अशी मागणी विरोधकांची आहे.  या मागणासीठी राजधानी ढाका येथे आयोजित रॅलीत हजारो लोक सहभागी झाले होते. गेल्या काही दशकांतील बंगलादेशातील ही सर्वांत मोठी रॅली असल्याचे मानले जाते. आंदोलकांनी दगडफेक, आणि जाळपोळ सुरू केल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधूराचा वापर करावा लागला. Violence in Bangladesh

या हिंसाचाराबद्दल एकमेकांवर आरोप केले जात आहेत. परराष्ट्र मंत्री ए. के. अब्दुल मोमेन म्हणाले, "आंदोलकांनी पोलिस, पत्रकार, हॉस्पिटल आणि सरन्यायाधीशांसह इतर काही न्यायमूर्तींच्या घरावर हल्ले केले. त्यातून हा हिंसाचार भडकला."
तर विरोधीपक्षाचे नेते अमिर चौधरी यांनी हिंसाचाराला सरकारला जबाबदार धरले आहे. विरोधीपक्षांनी या पोलिस कारवाईच्या विरोधात बंगलादेशात बंदही पुकारला होता.

खालेदा झिया गृहकैदेत

बंगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे नेतृत्त सध्या मिर्झा फखरूल इस्लाम आलमगीर हे करत आहेत. या पक्षाच्या नेत्या माजी पंतप्रधान खालेदा झिया यांना पाच वर्षांपूर्वी अटक झाली होती. सध्या त्या गृहकैदेत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news