बांगला देशला डेंग्यूचा डंख; ५ महिन्यांत ६०० बळी, लाखावर बाधित | Bangladesh Dengue Outbreak

बांगला देशला डेंग्यूचा डंख; ५ महिन्यांत ६०० बळी, लाखावर बाधित | Bangladesh Dengue Outbreak
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगला देशात डेंग्यूची मोठी साथ आली असून एप्रिलपासून आतापर्यंत तब्बल ६०० लोकांचा बळी या साथीत गेला आहे, तर आतापर्यंत १ लाख ३५ हजार लोकांना डेंग्यूची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक तापमान वाढ आणि एल निनोमुळे डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणावर फैलावत असल्याचे म्हटले आहे. (Bangladesh Dengue Outbreak)

डेंग्यूची साथ पसरल्याने रुग्णालयाच बेड कमी पडू लागले आहेत. १२ ऑगस्टला एकाच दिवशी तब्बल दहा हजार लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधित ६०० लोकांचा बळी गेला आहे, यात फक्त ऑगस्टमध्ये ३०० लोक मृत्युमुखी पडले आहेत. (Bangladesh Dengue Outbreak)

सर्वसाधारण प्रत्येक पावासात बंगालदेशात डेंग्यूची साथ येत असते, या वर्षी मात्र एप्रिल महिन्यात डेंग्यूची साथ पसरू लागली. बंगला देशातील ६४ जिल्ह्यांत हा डेंग्यूची साथ पसरली आहे, तर राजधानी ढाकाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे, असे CNNने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

बंगला देशातील जहांगिरनगर विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. कबिरूल बशर म्हणाले, "ढाका या शहरात पाण्याची समस्या नेहमीची आहे. त्यामुळे येथील लोक बादली, भांडी यात पाणी भरून ठेवतात. त्यातूनच डेंग्यूच्या प्रसाराला चालना मिळते." याशिवाय बंगलादेशात सांडपाणी निचरा, कचऱ्याचा उठाव या नागरी समस्याही मोठ्या प्रमाणावर आहेत.

बंगलादेशात अवेळी पडणारा पाऊस, त्या जोडीने उष्णता, आर्द्रता यामुळे डासांचा फैलाव वाढला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news