तस्‍लिमा नसरीन यांचा बांगलादेशवासीयांना सल्‍ला, “तुम्‍हाला पॅलेस्‍टाईनची एवढी…” | पुढारी

तस्‍लिमा नसरीन यांचा बांगलादेशवासीयांना सल्‍ला, "तुम्‍हाला पॅलेस्‍टाईनची एवढी..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मी जगातील कोठेही होणार्‍या अत्‍याचाराचा निषेध करते; आज बांगलादेशमध्‍ये पॅलेस्‍टाईनवर होणार्‍या अत्‍याचारावर काळजी केली जात आहे, अशीच काळजी बांगलादेशमधील जनतेने आपल्‍या देशातील अल्‍पसंख्‍याकांवर होणार्‍या अत्‍याचाराची करावी, त्‍याच्‍याही तेवढाच विचार करायला हवा, असा सल्‍ला ख्‍यातनाम बंगाली लेखिका तस्‍लिमा नसरीन यांनी बांगलादेशमधील पॅलेस्‍टाईनचे समर्थन करणार्‍यांना दिला आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्धाचा आज आठवा दिवस आहे. याबाबत सर्व इस्लामिक देश इस्रायलला उघड विरोध करत आहेत. या संदर्भात बांगलादेशातील जनताही पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहे. प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

…त्यांची सद्सद्विवेकबुद्धीही अस्वस्थ व्हायला हवी

आज (दि.१५) ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत तस्‍लिमा नसरीन म्‍हणाल्‍या की, “मी ऐकले आहे की माझे सहकारी बांगलादेशी नागरिक पॅलेस्टिनींवरील अत्याचारांबद्दल खूप चिडलेले आहेत. काही लोकांना पॅलेस्टाईनमध्ये जाऊन मदत करण्याची इच्छा करत आहेत. वैयक्तिकरित्या मी कुठेही कोणत्याही अत्याचाराच्या विरोधात आहे; पण मला सांगायचे आहे की, बांगलादेशातील लोकांना पॅलेस्टाईनमधील हल्ले आणि निर्वासितांबद्दल एवढीच काळजी वाटत असेल तर बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले होत असताना त्यांची सद्सद्विवेकबुद्धीही अस्वस्थ व्हायला हवी.”

गाझा सोडण्यासाठी 3 तासांचा वेळ

दरम्‍यान, इस्त्रायल आणि हमास यांच्यातील मागील आठ दिवसांपासून संघर्ष सुरूच आहे. इस्रायल गाझा शहरातवून आता जमिनीवर हल्‍ला करण्‍याच्‍या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे त्यांनी नागरिकांना गाळा सोडण्यासाठी २४ तासांची मुदत दिली. इस्रायली लष्कर IDF ने गाझाच्या नागरिकांना उत्तर गाझातून दक्षिणेकडे जाण्यासाठी 3 तासांचा वेळ दिला आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button