America on War : अमेरिकेने प.आशियात हवाई सुरक्षा वाढवली, जाणून घ्‍या कारण | पुढारी

America on War : अमेरिकेने प.आशियात हवाई सुरक्षा वाढवली, जाणून घ्‍या कारण

पुढारी ऑनलाईन डेस्क: इस्रायल-हमास  युद्धाचा प्रभाव जगभरातील देशांच्या संबंधावर होत आहे. अमेरिका, भारतासारख्या देशांनी इस्रायलला तर चीन, इराण या देशांनी पॅलेस्टिनला पाठिंबा दिला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिका पावले उचलणार असल्याचे अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी सांगितले. (America on War)

अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऑस्टिन यांनी म्हटलं आहे की, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका पश्चिम आशियामध्ये अतिरिक्त हवाई संरक्षण यंत्रणा तैनात करणार आहे. इराणसोबतच्या वाढत्या तणावामुळे अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. पश्चिम आशियात ताकद वाढवण्यासाठी अमेरिकेने टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स (THAAD) यंत्रणा आणि देशभक्त बटालियन पश्चिम आशियामध्ये पाठवेल असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. (America on War)

काय म्हणाले अमेरिकेचे संरक्षण मंत्री?

ऑस्टिन म्हणाले की, पश्चिम आशियामध्ये अतिरिक्त हवाई संरक्षण यंत्रणा तैनात केल्याने इस्रायलला या भागातील वाढता तणाव आणि हिंसाचार रोखण्यास मदत होईल. इराणच्या या प्रदेशातील वाढत्या कारवाया, युद्ध आणि लढाया याबाबत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी सविस्तर चर्चा करून या निर्णय घेण्यात आला आहे.या भागात अमेरिकेची लष्करी ताकद मजबूत करण्यासाठी अतिरिक्त शस्त्रे तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. इराण समर्थित संघटनांकडून मध्य पूर्वमध्ये (पश्चिम आशिया) तणाव वाढवण्याच्या प्रयत्नांबाबत अमेरिका सतर्क आहे. याआधी अमेरिकेने भूमध्य समुद्रात देखील आपल्या युद्धनौका तैनात केल्या असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. (America on War)

हेही वाचा:

Back to top button