‘हमास’कडून पॅलेस्‍टिनी नागरिकांचा ढाल म्‍हणून वापर : इस्‍त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू | पुढारी

'हमास'कडून पॅलेस्‍टिनी नागरिकांचा ढाल म्‍हणून वापर : इस्‍त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हमास विरुद्धचे युद्ध हे वेगळ्या प्रकारचे आहे. हा वेगळ्या प्रकारचा शत्रू आहे. तो पॅलेस्‍टिनी नागरिकांना ढाल म्‍हणून वापरत आहे. आता सुरु असलेल्‍या हिंसाचाराला केवळ हमासच जबाबदार आहे, असे सांगत विजयाचा मार्ग कठीण असेल; परंतू आमच्या सैनिकांच्या आणि नागरिकांच्‍या अतूट भावनेने अंतिमत: इस्रायलचा विजय होईल, असा विश्‍वास इस्‍त्रायलचे पंतप्रधान (Israel PM) बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी आज (दि.१८) व्‍यक्‍त केला. अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन यांनी इस्‍त्रायलला भेट दिली. यानंतर त्‍यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली.

यावेळी नेतन्‍याहू म्‍हणाले की, “हमास जास्तीत जास्त नागरिकांची हानी करण्याचा प्रयत्न करतो. ही दहशतवादी संघटना दुहेरी युद्ध करत आहे. पॅलेस्‍टिनी नागरिकांची ढाल करुन ते इस्‍त्रायलच्‍या नागरिकांना लक्ष्य करत आहेत. गेल्या ११ दिवसांत हमासकडून मानवतेविरुद्ध गुन्हे घडले आहेत.” (Israel PM Benjamin Netanyahu)

दुर्दैवाने नागरिकांचे नुकसान

इस्रायलने कायदेशीररित्या दहशतवाद्यांना लक्ष्य केल्यामुळे दुर्दैवाने नागरिकांचे नुकसान झाले आहे. मात्र या सर्व हिंसाचारास हमास जबाबदार आहे. सर्व नागरी हत्येसाठी हमास ही संघटनाच जबाबदार आहे. दहशतवाद्यांनी हॉस्‍पिटलवर रॉकेट हल्‍ला केला. आम्ही या युद्धात आगेकूच करत असताना इस्रायल नागरिकांवरील हल्‍ले वाढविण्‍याचा हमासचा प्रयत्‍न असल्‍याचेही नेतन्‍याहू यांनी सांगितले.

 

Back to top button