Afghanistan earthquake : अफगाणिस्तान पुन्हा हादरलं; ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप | पुढारी

Afghanistan earthquake : अफगाणिस्तान पुन्हा हादरलं; ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तान पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाने हादरले आहे. आज सकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी अफगाणिस्तानला ६.१ रिश्टर स्केलचा धक्का बसला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली. (Afghanistan earthquake)

अफगाणिस्तानमध्ये भूकंपातील मृतांची संख्या ४ हजारांवर

पश्चिम अफगाणिस्तानला शनिवारी (दि.७) ६.३ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाने हादरवून सोडले होते. या जोरदार भूकंपातील मृतांचा आकडा आता ४ हजारांवर पोहोचला आहे. तीव्र भूकंपाने येथील इमारती पडल्याने मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. यामध्ये मोठी जीवितहानी झाली असून सुमारे २ हजार घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यानंतर आज सकाळी पुन्हा अफगाणिस्तानला भूकंपाचे हादरे बसले आहेत. (Afghanistan earthquake)

संबंधित बातम्या : 

Back to top button