
पुढारी ऑनलाइन डेस्क : Earthquake Afghanistan : आज पहाटे अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे पहाटेच्यावेळी अफगाणिस्तान भूकंपाने हादरले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (NCS) ट्विट करून याची माहिती दिली आहे. NCS ने दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे 3.23 वाजता हा भूकंप झाला. अफगाणिस्तानच्या फैजाबादपासून 116 किमी आग्नेय दिशेला 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. दरम्यान, भूकंपात कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचे अद्याप वृत्त नाही.
हे ही वाचा :