पाकिस्‍तानला परतण्‍यासाठी नवाझ शरीफांची ‘धडपड’, बंधू शहबाज लंडनला रवाना | पुढारी

पाकिस्‍तानला परतण्‍यासाठी नवाझ शरीफांची 'धडपड', बंधू शहबाज लंडनला रवाना

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानला परतण्‍यासाठी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ ( Nawaz Sharif ) तयारी करत आहेत. यासाठी त्‍यांचे बंधू आणि माजी पंतप्रधान शहबाज शरीफ ( Shehbaz Sharif ) हे लंडनला रवाना झाले आहेत. त्‍यांना नवाझ पाकिस्‍तानमध्‍ये परतण्‍यापूर्वी  ठोस आश्‍वासने हवी आहेत, असे वृत्त पाकिस्तानच्या ‘डॉन न्यूज’ने दिले आहे.

दोनच दिवसांपूर्वी शहबाज लंडनहून पाकिस्तानात परतले होते. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुका आज जाहीर झाल्‍या आहेत. जानेवारी २०२४ च्‍या शेवटच्‍या आठवड्यात देशात मतदान होणार आहे. यामुळे आता नवाझ शरीफ आपला पुढील महिन्याच्या 21 तारखेला देशात परतण्यास उत्सुक असल्‍याचेही पाकिस्तानच्या ‘डॉन न्यूज’ने म्हटले आहे.

Nawaz Sharif यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला सामोरे जावे लागणार

चौधरी शुगभ मिल्‍स भ्रष्‍टाचार प्रकरणी पाकिस्‍तानमधील नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (एनएबी) हे नवाझ यांच्या संरक्षणात्मक जामिनाला विरोध करेल का, असा सवालही केला जात आहे. नवाजच्या आगमनापूर्वी काही आश्वासनांच्या शोधात होते. देशात परतल्यानंतर नवाझ शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाला सामोरे जावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे खटले पुन्हा सुरू केले आहेत. चौधरी शुगर मिल्स प्रकरणात नवाझ शरीफ यांना संरक्षणात्मक जामीन मिळणे आवश्यक आहे. जेणेकरुन त्यांचे पुनरागमन सुरळीतपणे होऊ शकेल, असेही सूत्रांनी म्‍हटले आहे.

शरीफ यांना पाकिस्‍तानमध्‍ये परतल्‍यानंतर अल-अझिझिया प्रकरणात न्यायालयासमोर आत्मसमर्पण करावे लागणार आहे. या प्रकरणी त्‍यांना सात वर्षांची शिक्षा झाली होती. 2019 मध्ये वैद्यकीय कारणास्तव देश सोडण्याची परवानगी मिळण्यापूर्वी ते लखपत तुरुंगात शिक्षा भोगत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता नवाझ शरीफ आणि शहबाज शरीफ यांना अनुक्रमे भूखंड आणि रमजान साखर कारखान्यांच्या वाटपाशी संबंधित प्रकरणी कायदेशील लढाई करावी लागणार आहे.

शाहबाज यांचा महिन्‍यातील दुसर्‍या लंडन दौर्‍यामुळे चर्चेला उधाण

, शाहबाज शरीफ यांनी सप्‍टेंबर महिन्‍याच्‍या प्रारंभीच लंडनला भेट दिली होती. दोनच दिवसांपूर्वी ते पाकिस्तानला परतले होते. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या लंडन दौऱ्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. नवाझ शरीफ यांची मुलगी आणि पक्षाच्या उपाध्यक्षा मरियम नवाज याही लंडनला पोहोचल्याने शाहबाज शरीफ यांच्‍या दौरा पाकिस्‍तानमधील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा :

Back to top button