Brucella Canis Infects Humans
Brucella Canis Infects Humans

Brucella Canis Infects Humans : धोक्याची घंटा! कुत्र्यांमधील ‘ब्रुसेला कॅनिस’ रोगाचे मानवात संक्रमण; तिघांना लागण

Published on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Brucella Canis Infects Humans : युकेत कुत्र्यांना होणारा असाध्य असा ब्रुसेला कॅनिस रोग आता माणसांमध्ये संक्रमित झाला आहे. हा जिवाणूंमुळे पसरणारा रोग आहे. जो बाधित कुत्र्यांच्या शारीरिक द्रवांच्या संपर्कातून जसे मूत्र, विष्ठा, रक्त, लाळ, जखम इत्यादींमधून मानवामध्ये संक्रमित होऊ शकतो. इंडिया टुडेने याचे सविस्तर वृत्त दिले आहे.

संबंधित बातम्या :

Brucella Canis Infects Humans : काय आहे ब्रुसेला कॅनिस रोग

ब्रुसेला कॅनिस हा युकेमधील कुत्र्यांमध्ये पसरणारा असाध्य असा रोग आहे. कॅनाइन ब्रुसेलोसिस, ब्रुसेला कॅनिस (बी. कॅनिस) या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. हा जिवाणू संसर्ग, प्रामुख्याने कुत्र्यांमध्ये आढळतो, हा अत्यंत संसर्गजन्य आहे. यामुळे वंध्यत्व, हालचाल समस्या आणि बाधित कुत्र्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होते.

मात्र आता हा आजार ब्रिटनमध्ये मानवांमध्ये संक्रमित होऊन त्याचा संसर्ग होत आहे. बाधित कुत्र्यांच्या शारीरिक द्रवांच्या जसे की लाळ, मूत्र तसेच पुनरुत्पादक किंवा रक्त उत्पादनांच्या थेट संपर्कात आल्याने हा आजार कुत्र्यांमधून मानवांमध्ये संक्रमित होत आहे. ब्रिटनमध्ये तीन ब्रिटिश नागरिकांना ब्रुसेला कॅनिसची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.

Brucella Canis Infects Humans : ब्रुसेला कॅनिसची लक्षणे

मानवांमध्ये ब्रुसेला कॅनिस संसर्गाची लक्षणे सहसा सौम्य आणि विशिष्ट नसतात, ज्यामुळे निदान करणे कठीण होते. सामान्य लक्षणांमध्ये अधूनमधून किंवा अनियमित ताप, भूक न लागणे, वजन कमी होणे, घाम येणे, डोकेदुखी, थकवा आणि पाठ किंवा सांधेदुखी यांचा समावेश होतो. काही प्रकरणांमध्ये, आजारामुळे वारंवार ताप आणि थकवा यांसह दीर्घकाळ टिकणारी लक्षणे दिसू शकतात.

Brucella Canis Infects Humans : ब्रुसेला कॅनिस मानवांमध्ये कसा संक्रमित होतो?

ब्रुसेला कॅनिसचे मानवांमध्ये संक्रमण प्रामुख्याने थेट संपर्काद्वारे किंवा संक्रमित प्राण्यांच्या द्रवपदार्थांच्या जसे मूत्र, विष्ठा, रक्त, लाळ, जखम इत्यादींच्या एरोसोलच्या संपर्काद्वारे होते. जिवाणू किंवा श्लेष्मल त्वचा दूषित होणे आणि त्वचा फाटणे यामुळे देखील संसर्ग होऊ शकतो.

Brucella Canis Infects Humans : ब्रुसेला कॅनिसचे निदान आणि उपचार

ब्रुसेलोसिसच्या निदानामध्ये सामान्यत: रक्त तपासणी केली जाते आणि संसर्गावर किमान सहा आठवडे प्रतिजैविकांच्या कोर्सने उपचार केले जातात. प्रदीर्घ उपचार कालावधी असूनही, रुग्णांनी पूर्ण बरे होईपर्यंत उपचार सुरू ठेवायला हवेत अन्यथा रोग पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Brucella Canis Infects Humans : ब्रुसेला कॅनिसचा प्रतिबंध

सध्या या आजारावर कोणतीही लस उपलब्ध नसल्याने ब्रुसेलोसिसचा प्रतिबंध महत्त्वाचा आहे. संक्रमित कुत्र्यांकडून शारीरिक द्रव (जसे की मूत्र, विष्ठा, उलट्या, लाळ, रक्त, जखमेचा निचरा आणि पुनरुत्पादक द्रव) यांच्याशी थेट संपर्क टाळावा.

जे प्राणी हाताळतात त्यांनी रबरचे हातमोजे घालावेत, विशेषत: प्राण्यांच्या अंतर्गत अवयवांना हाताळताना रबरचे मोजे घालणे गरजेचे आहे. ब्रिटिश व्हेटर्नरी असोसिएशनने नमूद केले आहे की पब्लिक हेल्थ इंग्लंडने परिस्थितीचे मूल्यांकन केले आहे आणि ब्रुसेला कॅनिसचा प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशातून कुत्रे आयात करण्यात गुंतलेल्या पशुवैद्यकीय तज्ञ आणि संस्थांना आवश्यक मार्गदर्शन दिले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news