चिमुकल्याने गिळल्या इंजेक्शनच्या आठ सुया | पुढारी

चिमुकल्याने गिळल्या इंजेक्शनच्या आठ सुया

लिमा: कुटुंबाच्या निष्काळजीपणामुळे कधी कधी मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. एक अशीच भयानक घटना पेरू देशात दोन वर्षांच्या मुलासोबत घडली आहे. अजाणतेपणी या मुलाने इंजेक्शनच्या तब्बल आठ सुया गिळल्या आहेत. या चिमुकल्यासोबत घडलेली ही घटना ऐकून डॉक्टरही चकित झाले. त्यांनी ताबोडतोब मुलावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. डॉक्टरांच्या उपचारांमुळे या मुलाचा जीव वाचला आहे.

डॉ. इरफान सालजार यांनी सांगितले, आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच्या पोटाचा एक्स-रे पाहिला तेव्हा आतमध्ये लोखंडासारखी काही वस्तू दिसत होती. यानंतर शस्त्रक्रिया करून सर्व आठही सुया बाहेर काढण्यात आल्या. या सुया प्रामुख्याने शेतातील प्राण्यांना लस देण्यासाठी वापरल्या जातात. या मुलाची आई शेतात काम करते. ती शेतात काम करत असताना त्याने खेळता खेळता या सुया गिळल्या असतील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेत ५२ वर्षीय एका महिलेने व्हिटॅमिनची गोळी समजून तिने चक्क नवऱ्याचे एअरपॉड गिळले होते.

हेही वाचा : 

Back to top button