‘X’ वर आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग फिचर; एलन मस्क यांची घोषणा | पुढारी

'X' वर आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग फिचर; एलन मस्क यांची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर (पूर्वीचे Twitter) लवकरच ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग फिचर आणणार असल्याची घोषणा आज (दि.३१ ऑगस्ट) एलन मस्क यांनी केली आहे. या फिचरमध्ये यूजर्स नंबर शेअर न करता ऑडिओ-व्हिडिओ कॉल करू शकतील. कंपनीचे मालक एलन मस्क यांनी ‘X’ वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. यापूर्वी कंपनीच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी सीएनबीसी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याची (Video & audio calls on ‘X’) पुष्टी केली होती.

अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांनी गेल्या वर्षी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी अनेक बदल केले आहेत. मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव बदलत सगळ्यात मोठा बदल केला आहे. त्यांनी ‘ट्विटरचे नाव बदलून ‘एक्स’ केले आहे. आता ते मेटाच्या सर्व प्लॅटफॉर्मशी एकहाती स्पर्धा करण्यास एलन मस्क यांच्या मालकीचे प्लॅटफॉर्म ‘एक्स’ तयार आहे. याचप्रमाणे एक्स या प्लॅटफॉर्मवर ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग फिचर आणत असल्याची एक (Video & audio calls on ‘X’) मोठी घोषणा मस्क यांनी केली आहे.

एलन मस्क यांनी केलेल्या नवीन फिचरच्या घोषणेमुळे व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुकप्रमाणेच युजर्संना आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करता येणार आहे. मस्क यांनी या संदर्भात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘X’ वरीस हे नवीन फिचर सर्व प्रकारचे फोन आणि लॅपटॉप यूजर्संना वापरता येणार आहे. हे फीचर अँड्रॉइड, आयओएस आणि लॅपटॉपमध्ये सहज उपलब्ध होईल. त्याचवेळी, व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलसाठी कोणाचा फोन नंबर माहित असणे आवश्यक नाही. नंबर माहित नसतानाही लोक X च्या माध्यमातून एकमेकांशी बोलू शकतील, असेही मस्क यांनी केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट (Video & audio calls on ‘X’) केले आहे.

हेही वाचा:

Back to top button