वॅग्नर ग्रुप प्रमुख प्रिगोझिन यांचा मृत्‍यू विमान अपघातातच, ‘जेनेटिक’ चाचणीत पुष्‍टी | पुढारी

वॅग्नर ग्रुप प्रमुख प्रिगोझिन यांचा मृत्‍यू विमान अपघातातच, 'जेनेटिक' चाचणीत पुष्‍टी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्‍याविरोधात बंडाचा झेंडा फडकविणारे वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा नुकताच विमान अपघातात मृत्‍यू झाला होता. प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्‍यू झाल्‍याचे जेनेटिक (अनुवांशिक) चाचण्‍यांनी पुष्‍टी केली असल्‍याचे रशियन गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने म्‍हटले असल्‍याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे. (Prigozhin died in plane crash)

रविवारी सूत्रांनी सांगितले की, बुधवार २३ ऑगस्‍ट रोजी मॉस्कोच्या वायव्येकडील टव्हर प्रदेशात खासगी जेट विमान कोसळले होते. यामध्‍ये फडकविणारे वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्‍यासह १० जण प्रवास करत होते. विमान अपघातात या सर्वांचा मृत्‍यू झाला. मृतांमध्‍ये प्रिगो्रजन यांचा निकटवर्ती दिमित्री उत्किन याचाही समावेश होता.अपघातात मृत्‍युमुखी पडेलेल्‍या सर्व १० मृतांची ओळख पटली आहे, असे रशियाच्‍या तपास समितीने म्‍हटले आहे. (Prigozhin died in plane crash)

बंडानंतर दोन महिन्‍यातच प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्‍यू

वॅग्नर ग्रुप हा रशियातील खासगी सैन्‍य आहे. याचा प्रमुख येवगेनी प्रिगोझिन हे एकेकाळी पुतिन यांचे सर्वात निकटवर्ती मानले जात. पुतिन यांच्‍या हट्‍टामुळे युक्रेन युद्‍ध सुरु झाले. या युद्‍धाला दीड वर्ष झाले तरी ठोस निर्णय झालाच नाही. यानंतर रशियात पुतिन यांच्‍या नेतृत्त्‍वाविरोधात सूर उमटत असल्‍याची चर्चा पाश्‍चात्‍य माध्‍यमातून होत होती. यानंतर प्रिगोझिन यांनी बंडाची घोषणा केली आणि जगभरात खळबळ माजली. आता रशियाचे पुन्‍हा तुकडे होणार, युक्रेनचे युद्‍ध थांबवणार असे अशी अनेक विश्‍लेषण करण्‍यात येवू लागली. मात्र प्रिगोझिन यांचे बंड औटघटकेचे म्‍हणजे केवळ काही तासांचे ठरले. प्रिगोझिन यांनी तलवार म्‍यान करत पुतिन यांना शरण गेले. त्‍याचचेळी अनेकांनी त्‍यांच्‍या भविष्याबद्दल शंका व्‍यक्‍त केली होती. यानंतर अवघ्‍या दोन महिन्‍यात बुधवार २३ ऑगस्‍ट रोजी विमान अपघातात प्रिगोझिन यांचा मृत्‍यू झाला. हे विमान नेमकं कसे कोसळले याचे कारण अज्ञात आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा : 

 

 

Back to top button