Russia Wagner Group : पुतिन यांनी देशद्रोही घोषित केलेल्या वॅगनर ग्रुपविषयी जाणून घ्या…

Wagner Group
Wagner Group

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियातील परिस्थिती सध्या गंभीर बनली आहे. देशातील खासगी स्वरुपातील आर्मी म्हणून नावाजलेल्या वॅगनर ग्रुप आणि त्याचा प्रमुख प्रिगेझेनी याला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी देशद्रोही घोषित केले आहे. पुतीन यांनी पाठीत खंजीर खुपसणाऱ्या वॅगनर ग्रुपला सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. वॅगनरच्या प्रमुखाने देशाला दिलेल्या इशाऱ्यानंतर रशियन अधिकाऱ्यांनी सुरक्षेसाठी कडक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. जाणून घेऊयात वॅगनर ग्रुपविषयी…. (Wagner Group)

'बखमुत'वर मिळवला ताबा (Wagner Group)

वॅगनर ग्रुपला अधिकृतपणे पीएमसी वॅगनर म्हणतात. ही एक रशियन निमलष्करी संघटना आहे. ज्याला देशाचा कोणताही कायदा लागू होत नाही. प्रत्यक्षात ही एक खासगी लष्करी कंपनी आणि भाडोत्री सैनिकांचे नेटवर्क आहे. पूर्व युक्रेनमधील संघर्षादरम्यान २०१४ मध्ये या ग्रुपची प्रथम ओळख झाली होती. त्या वेळी ही एक गुप्त संघटना होती. जी मुख्यतः आफ्रिका आणि मध्य पूर्वमध्ये कार्यरत होती. बीबीसीच्या वृत्तानुसार, ही संघटना युक्रेन मोहिमेचा महत्त्वाचा भाग बनली आहे. पूर्व युक्रेनमधील बखमुट शहरावर रशियाच्या ताब्याचे श्रेयही वॅगनर समूहाला जाते.

वॅगनर हे नाव कसे आले?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गटात रशियाच्या एलिट रेजिमेंट्स आणि स्पेशल फोर्समधील सुमारे ५,००० सैनिकांचा समावेश आहे. जानेवारीमध्ये, यूकेच्या संरक्षण मंत्रालयाने अहवाल दिला की वॅगनर ग्रुपमध्ये आता युक्रेनमध्ये ५०,००० सैनिक आहेत. वॅगनरचे नाव त्याच्या पहिल्या कमांडर दिमित्री उत्किनच्या नावावरुन ठेवण्यात आले. ते रशियन सैन्याच्या विशेष दलाचे निवृत्त लेफ्टनंट कर्नल होते. वॅगनर हे त्याचे टोपणनाव होते. वॅगनरने एक संस्था म्हणून एक प्रतिमा स्थापित केली. पाश्चात्य देश आणि संयुक्त राष्ट्र (UN) तज्ज्ञांनी वॅगनरच्या सैन्यावर मध्य आफ्रिकन रिपब्लिक, लिबिया आणि मालीसह संपूर्ण आफ्रिकेतील मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. (Wagner Group)

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news