

पुढारी ऑनलाईन : चांद्रयान-३ मोहीम फत्ते करत, इस्रोने काल (दि.२३ ऑगस्ट) नवीन इतिहास रचला. चांद्रयान-३ च्या लँडर मॉड्यूलचे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर त्यातून रोव्हर खाली उतरले. यानंतर रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच भारताच्या विश्वविक्रमाच्या खुणा उमटवल्या. रोव्हरने भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) खुणा साकारल्या आहेत. (Chandrayaan-3)
साऱ्या जगताला उत्सुकता असलेली भारतीय चांद्रयान-३ मोहीम अखेर फत्ते झाली आहे. यानंतर चांद्रयान-3 लँडिंग होताच भारताने दोन विक्रम प्रस्थापित केले. यातील पहिला विक्रम म्हणजे सॉफ्ट लँडिंग यशस्वी केले. तर दुसरा विश्वविक्रम म्हणजे अमेरिका, रशिया व चीननंतर भारत असा अंतराळ पराक्रम गाजवणारा चौथा देश ठरला. या यशस्वी मोहीमेनंतर चांद्रयान-3 चंद्रावर राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ साकारले आहे.
सॉफ्ट लॅंडिंगनंतर विक्रम लँडरच्या रॅम्पवरून प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरले आणि त्याने चंद्रावर फेरफटका मारला. याबाबतची माहिती इस्रोने दिली आहे.
हेही वाचा