चीनमध्ये मंदीचे वारे; सर्वांत बलाढ्य बांधकाम कंपनी दिवाळखोरीत | Evergrande files for bankruptcy

चीनमध्ये मंदीचे वारे; सर्वांत बलाढ्य बांधकाम कंपनी दिवाळखोरीत | Evergrande files for bankruptcy

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीन आर्थिक मंदीचे वारे वाहू लागले आहे. यातच चीनमधील प्रमुख बांधकाम कंपनी एव्हरग्रेनेडने दिवाळीखोरी जाहीर केली आहे. या कंपनीने मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले होते, पण २०२१पासून ही कंपनी कर्जाचे हप्ते भरू शकलेली नाही, त्यामुळे चीनमध्ये घरांचे मोठे संकट उभे राहिले. (Evergrande files for bankruptcy)

Evergrande files for bankruptcy

एव्हरग्रेनेड कंपनीने न्यूयॉर्कमध्ये कलम १५च्या आधारे ही दिवाळीखोरी जाहीर केलेली आहे. कलम १५च्या आधारे दिवाळीखोरी जाहीर केल्यानंतर अमेरिकेतील दिवाळखोरीसंदर्भातील न्यायालय हस्तक्षेप करू शकतात. ज्या प्रकरणात इतर देशांचा सहभाग असतो, त्यासाठी कलम १५चा आधार घेतला जातो. अमेरिकेतील न्यायालय, कर्ज देणाऱ्या वित्तसंस्था आणि बँका आणि इतर देशांतील न्यायालये परस्पर सहकार्यातून ही कारवाई करतात. सीएनएन या वेबसाईटवर ही बातमी देण्यात आली आहे.

एव्हरग्रेनेडच्या दिवाळीखोरीचे परिणाम  | Evergrande files for bankruptcy

चीन ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे. बांधकाम व्यवसाय चीनच्या आर्थिक विकासात अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. चीनच्या एकूण जीडीपीमध्ये बांधकाम व्यवसायाचा वाटा ३० टक्के इतका आहे. २०२१ला एव्हरग्रेनेडने कर्जाचे हप्ते थकवल्यानंतर त्याचे परिणाम बांधकाम व्यवसायावर दिसून आला. त्याचा फटका घर घेऊ इच्छिणारे सामान्य लोक आणि वित्त व्यवस्थेवर झाला.

एव्हरग्रेनेडचे महत्त्व | Evergrande files for bankruptcy

एव्हरग्रेनेडकडे आजच्या घडीला १३०० रिअल इस्टेट प्रोजेक्ट आहेत. २८० शहरांत या कंपनीचा विस्तार झालेला आहे. या कंपनीवर ३४० अब्ज डॉलर इतके प्रचंड कर्ज आहे. चीनच्या एकूण जीडीपीच्या दोन टक्के कर्ज या कंपनीवर आहे. २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांत गुंतवणुकदारांना ८१ अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. या कंपनीने कर्जाची परतफेड करण्याचेही प्रयत्न केले होते. त्यासाठी कर्जाचे पुनर्घटनही करण्यात आले. हे पुनर्घटन चीनच्या इतिहासातील सर्वांत मोठे मानले जाते. त्यानंतर या कंपनीने निधी उभारण्यासाठी प्रयत्न केले होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news