महिलांच्या ड्रेसचा खिसा आणि त्यामागचं राजकारण, जाणून घ्या…

महिलांच्या ड्रेसला खिसा का नसतो?
महिलांच्या ड्रेसला खिसा का नसतो?

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येक व्यक्तीला जिज्ञासा ही असतेच. त्यातीलच एक महिलांच्या ड्रेसचा 'खिसा' हा एक विषय आहे. हा विषय अगदीचा साधासुधा आणि दुर्लक्षित मुद्दा आहे. कोण त्याच्याकडे गांभिर्याने पाहतो? पण, जिथं महिल्यांच्या कपड्यांना आजही साधा खिसा नाही, तिथं आधुनिकतेच्या गप्पांना काही अर्थ नाही. मंडळी, महिलांच्या कपड्यांना खिसा का नसतो माहितीय? याची पाळंमुळं राजकीय इतिहासात सापडतात. चला तर, त्याचं उत्तर पाहून पाहू…

महिलांच्या ड्रेसला खिसा का नसतो?
महिलांच्या ड्रेसला खिसा का नसतो?

तसं पाहिलं तर, भारतात साडी घालण्याची परंपरा आहे. त्यामुळे साडीला खिसा असण्याची कल्पनाच न केलेली बरी. पण, महिला इतर कपडे घालतातच की! तरीही त्यांच्या कपड्यांना खिसा दिसत नाही. का? पहिल्यांदा पुरुषांच्या कपड्यांना खिसा असण्याची पद्धत कधी सुरू झाली, हे आपल्याला माहिती पाहिजे की… तर १६०० शतकाच्या दरम्यान पहिल्यांदा पुरुषांच्या कपड्यांना खिसे लागले. पुरुषांच्या कपड्यांच्या इतिहासात खिसा लावणे, हा महत्वाचा निर्णय होता.

कपड्यांना खिसा असण्याची फॅशन प्रचंड लोकप्रिय ठरली. ती खिशाची लोकप्रियता इतकी टोकाला गेली की, कपड्यांना खिसा असणं, म्हणजे 'मर्द' असं समजलं गेलं. आता आपण १०० वर्षे पुढं सरकूया. म्हणजेच १७ व्या शतकात महिलांच्या ड्रेसचा खिसा ही संकल्पना पहिल्यांदा आली. पण, हा खिसा महिल्यांच्या कपड्यांना कुठे होता, हे कुणाच्या लक्षात येत नव्हतं. तर, १७ व्या शतकात युरोपात 'हूप स्कर्ट' नावाची पद्धत आली.

हूप स्कर्ट म्हणजे भला मोठा झगा. या मोठ्या झग्याच्या आतील बाजूस खिशासारखी एक व्यवस्था केलेली होती. हूप स्कर्टची पद्धत महिलांची ओळख झाली, जशी १६ व्या शतकात पुरुषांच्या कपड्यांची ओळख झाली. यानंतरचा काळ आला महिलांकडे झिरो फीगर किंवा स्लिम-ट्रिम पाहण्याचा! आता आपल्या पुरुषी वृत्तीच्या समाजाने महिलांकडे स्टिम-ट्रिम पाहायचं ठरवलंच आहे, तर महिलांच्या अंगावरील कपड्यांना खिसा असणं, या विचाराची कल्पनाच होऊ शकत नाही. समजा महिलांच्या कपड्यांना खिसा ठेवला, तर सुंदरता बिघडून जाईल, असा विचार पुढे आला. हेच ते मुख्य कारण आहे महिलांच्या कपड्यांना खिसा नसणयांचं!

तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की, मुलीच्या टाॅपला किंवा वरच्या शर्टला खिसा दिसत नाही. थोडक्यात काय… तर, महिलांच्या भावनांचा विचार न करता पहिल्यांदा त्यांच्या सुंदरतेचा विचार केला जातो. त्यामुळे महिलांच्या कपड्यांचा खिसा गायब झाला. आता खिसा नाही, तर त्याला पर्याय काय? तर पर्याय 'शॅटलेन'चा आला. आता हे शॅटलेन म्हणजे काय तर थोडक्यात किचन. त्यामध्ये छोटाला चाकू, वही, पेन, सुई किंवा चाव्या अशा वस्तू एकाच साकळीला असतात. अहो, ही 'शॅटलेन'ची पद्धत उच्चभ्रू असल्याचं लक्षण मानलं जायचं. फ्रेंच राज्यक्रांतीमागची मूळ प्रेरणाच 'शॅटलेन' होती. त्यांचं असं म्हणणं होतं की, "जी महिला आपल्या वस्तू लपवण्यात सक्षम नसते तिचा क्रांती घडणं अशक्य आहे." आता कळलं ना? खिसा ही गोष्ट साधीसुधी नाही.

महिलांच्या ड्रेसला खिसा का नसतो?
महिलांच्या ड्रेसला खिसा का नसतो?

आता पुन्हा मूळ विषयावर येऊ… लंडनमध्ये १८ व्या शतकात महिलांच्या कपड्यांना खिसा नाही म्हणून काही महिलांनी क्रांतीच केली. आता ही क्रांती कशी तर, सुंदरतेचं कारण देऊन विनाखिश्यांची महिलांची जी कपडे विकली जात होती त्याला विरोध केला. इतकंच नाही, तर लंडनमध्ये 'रॅशनल ड्रेस सोसायटी'ची स्थापना केली. हा मुद्दा लंडनमध्ये चांगलाच पेटला होता. तरीही 'Suffragette suit' नावाचं कोट महिलांसाठी तयार करून घेण्यात आला, त्याला ६ खिसे होते. तत्कालिन परिस्थितीत ही मोठी क्रांतीच म्हणावी लागेल. हा खिशांचा ट्रेंड दुसऱ्या महायुद्धापर्यंत चालला.

नंतर हा ट्रेंडही मागे पडला आणि स्कर्ट ट्रेंड आला. इथंच महिल्यांचा कपड्यांची खिसा हा मुद्दाच बाजूला पडला. पण, एक गोष्ट लक्षात घ्या की, या काळात 'पर्स' ही वस्ती बाजारा आली. त्याचबरोबर 'पाऊच' हीदेखील वस्तू बाजारात मिळू लागली. मला एक सांगा की, आता महिलांचा कपड्यांचा खिसाच गायब झाला, तर पर्स आणि पाऊच हा धंदाच तेजीत आला. आजदेखील पर्सचा धंदा जबरदस्त चाललाय. तर मंडळी कळलं का महिलांच्या कपड्यांना खिसा का नसतो?

पहा व्हिडीओ : गरीब मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा जोकर

हे वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news