

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान येथील एका विद्यापीठातील विद्यार्थिनींचे ५५०० हून अधिक सेक्स व्हिडीओ प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा सूत्रधार पाकिस्तानच्या एका केंद्रीय मंत्र्याचा मुलगा असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. (Pakistan Sex Racket)
पोलिसांनी तपासात पाकिस्तानातील एका विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकडून जवळपास ५५०० अश्लिल व्हिडिओ जप्त केले. शेहबाज शरीफ मंत्रिमंडळात समावेश असलेले केंद्रीय मंत्री चौधरी तारिक बशीर चीमा यांचा मुलगा इजाज शाह या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Pakistan Sex Racket)
या प्रकरणात विद्यापीठाच्या सुरक्षा प्रमुखाचा देखील समावेश होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. संबंधित आरोपीचे वडील मंत्री चौधरी तारिफ बशीर यांनी हे प्रकरण उघडकीस येऊ असे प्रयत्नदेखील केले होते. या अश्लिल व्हिडिओ प्रकरणाबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. थेट मंत्र्याच्या मुलाचाच या प्रकरणात समावेश असल्याने या प्रकरणाची चर्चा सगळीकडे आहे.
इजाज विद्यापीठातील मुलींशी मैत्री करायचा. त्यानंतर त्यांना ड्रग्ज देत होता. मुलींशी घट्ट मैत्री झाल्यानंतर त्यांना अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करायला लावायचा. तसेच शेकडो विद्यार्थिनींचे लैंगिक शोषणही करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सर्व प्रकरणात इजाजने जवळपास ५५०० हून अधिक मुलींच्या अश्लिल व्हिडिओ बनवले असल्याचे पोलीस तपासात सांगण्यात आले आहे.
हेही वाचा