‘या’ ५ सेक्सी घटनांमुळे जगाच्या इतिहासच बदलला! | पुढारी

'या' ५ सेक्सी घटनांमुळे जगाच्या इतिहासच बदलला!

पुढारी ऑनलाईन डेस्क

सेक्स माणसाच्या आयुष्यात अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सेक्सवर भाष्यच नसेल तर ती कथा वाचण्यात वाचकांनीही रस नसतो. कथा, कांदबरी, चित्रपट, नाटक आणि इतर तत्सम मनोरंजन क्षेत्रातील प्लॅटफाॅर्म असोत, सेक्स, रोमांस, गुलाबी प्रेमकथा, प्रेमावरील गाणी, असं असेल तर, दोन तासांचा चित्रपट असो की, २०० पानांची कांदबरी प्रेक्षक किंवा वाचक स्थिर राहण्याची शक्यता जास्त असते. आज आपण अशा लैंगिक नात्यांसदर्भातील ५ ऐतिहासिक प्रेम कथा अर्थात त्यामागे सेक्स हाच उद्देश होता, सांगणार आहोत, ज्यांनी जगाचा इतिहास बदलून गेला. एकदा वाचाच, कुणा-कुणाच्या सेक्स या अपेक्षेमुळे जगाचा इतिहास बदलत गेला. 

The love affair of Cleopatra and Mark Antony.

क्लिओपात्राचा सेक्समुळे रोमन साम्राज्याची राजधानीच हलली

इसवी सन पूर्व  ६९-३० दशकादरम्यान, क्लिओपात्रा नावाची इजिप्तच्या राणी होती. क्लिओपात्राचं रुप मनमोहक आणि आकर्षक होतं. ती आपल्या महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी रोममधील सामार्थ्यवान माणसांचा उपयोग करत असे. त्यासाठी ती अनैतिक संबंधही प्रस्थापित करत असे. क्लिओपात्राने जुलियस सीझरशी पहिल्यांदा अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यानंतर सीझरची हत्या (इसवी पूर्व ४६) झाली. मार्क एन्टोनी जो सीझरचा विश्वासू आणि सर्वोत्कृष्ट जनरल होता. त्यामुळे क्लिओपात्राने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात एन्टोनीला ओढले. 

अधिक वाचा ः लोकांची सेक्स करण्याची इच्छा का कमी होतेय?

क्लिओपात्राशी निव्वळ सेक्स करायला मिळावा, म्हणून एन्टोनीने तिला हवे असणरे सर्व राज्ये राज्य जिंकून दिले. पण, त्यातून एन्टोनीचे मोठ्या प्रमाणात शत्रू तयार झाले. शेवटी आर्किव्हल ऑक्टॅव्हियनविरुद्ध झालेल्या रक्तरंजीत युद्धात त्याचा सपाटून पराभव झाला, त्यामुळे त्याने इसवी सन पूर्व ३० व्या शतकात आत्महत्या केली. ऑक्टेव्हियनचा ऑगस्टस हा रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट झाला. 

वाचा ः थोर विचारवंतांच्या ‘सेक्स’बद्दलच्या टिप्स माहिती आहेत का?

क्लिओपात्राने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात मार्क एन्टोनीला ओढले नसते, तर मार्क एन्टोनीने ऑगस्टसचा सहज परावभ केला असता आणि तो रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट झाला असता. त्यामुळे रोमन साम्राज्याची राजधानी रोममधून इजिप्तच्या अलेक्झांड्रिया येथे हलवली गेली. एकंदरित काय, तर रोमन साम्राज्यातील मार्क एन्टोनी हा क्लिओपात्राच्या अनैतिक संबंधाच्या नात्यात बरबाद झाला आणि अख्खा रोमन साम्राज्य दुसऱ्याकडे गेलं. 

Not such a prude after all: the secrets of Henry VIII's love life -  HistoryExtra

अ‍ॅनी बोलेनचा सेक्समुळे इंग्लंडमध्ये उद्भवला धार्मिक संघर्ष

एखाद्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात कसं ओढायचं, हे कौशल्य अ‍ॅनी बोलेन या सुंदर स्त्रीने फ्रेंच दरबारातून (१५०१-१५३६) आत्मसात केलं होतं. इंग्लंडचा राजा हेन्री आठवा (१४९१-१५४७) याला अ‍ॅनीने मोहित करून टाकले. अ‍ॅनीला दुसरी शिक्षका व्हायचं नव्हतं, तर तिला इंग्लंडची राणी व्हायचं होतं. 

वाचा ः प्रथमच सेक्स करताय? तर, ‘ही’ काळजी नक्की घ्या! 

हेन्री आठवा याचे पहिलेच कॅथरिन ऑफ एरागाॅनशी लग्न झालेले होते. हेन्रीने हे लग्न रद्द करून टाकण्याचे पाॅपला सांगितले. पण, पाॅपने नकार दिला. मग हेन्रीने काय केले? तर, त्याने कशाचाही विचार न करता अ‍ॅनी बोलेनशी लग्न केले, त्यासाठी चर्च ऑफ इंग्लंडची स्थापना केली. 

वाचा ः कोरोनानंतर किती दिवसांनी करावा सेक्स?

या चर्चाचा सर्वोच्च नेता या नात्याने दुसरे लग्न करण्याचा अधिकार हेन्रीने स्वतःकडे घेतला. अ‍ॅनी बोलेनशी निव्वळ सेक्स करायला मिळावा म्हणून त्याने चक्क चर्चची स्थापना केली आणि दुसरे लग्न करून घेतले. इथं त्यांने कॅथोलिक धर्माभिमानाचा विचारच केला नाही, त्यामुळेच नंतरच्या काळात धर्मावरून अनेक संघर्ष घडले. एकंदरित काय, हेन्रीनं अ‍ॅनीबरोबर लग्न केलं नसतं, तर धार्मिक संघर्षच उद्भ्वला नसता.

Habsburg royal family were deformed due to inbreeding | News | The Times

नात्यातील व्यक्तीशी सेक्स केल्यामुळे स्पॅनिश राज्यकर्त्यांचा विद्ध्वंस

१६ आणि १७ व्या शतकामध्ये हेब्सबर्ग घराण्याने स्पॅनिश साम्राज्यावर राज्य केले. आपल्या साम्राज्याचे तुकडे होऊ नयेत म्हणून त्यांनी नात्यातल्या नात्यात लग्नं केलीत. १५१६ ते १७०० च्या दरम्यान झालेल्या लग्नांपैकी साधारणपणे ११ पैकी ९ लग्नं ही अनैतिकच होती. स्पेनचा राजा चार्ल्स दुसरा याचे आई-वडील हे सख्खे काका आणि पुतणी होते.

वाचा ः डेटिंग अ‍ॅप्सद्वारे ‘व्हर्च्युअली सेक्स’चं प्रमाण वाढलंय!

अशा विचित्र नात्यांमुळे चार्ल्स दुसरा आपल्या मुलांना जन्मच देऊ शकला नाही. कारण, त्याच्याकडे केवळ एकच अंडकोश होता. त्याच्या या विकलांगतेमुळे तो केवळ बोलू आणि खाऊ शकत असे. जेव्हा त्याचा १७०० मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर हेब्सबर्गची ही अनैतिक वंशावळ संपुष्टात आली. 

वाचा ः पृथ्वीतलावर पहिला ‘सेक्स’ कधी आणि कुणी केला? 

पुढेस्पॅनिश मिळविण्यासाठी रक्तरंजीत युद्ध झाले. १७१४ स्पॅनिश साम्राज्याचा शेवट झाला आणि तिथे फ्रेंचचा बाॅर्बोन्स अधिपत्य स्थापित झाले. एकंदरित काय, जर स्पॅनिश हेब्सबर्ग राज्यकर्त्यांनी नात्यात लग्नचं केली नसती, तर त्यांना आपली गादी वाचवता आली असती. कदाचित त्यांच्या हेब्सबर्ग राज्यकर्त्यांनी अख्खा युरोप एकत्र केला असता.

True Love That Destroyed the Empire | History of Yesterday

एलिक्साबरोबर सेक्स आणि झार निकोलसचा खात्मा 

एलिक्स ऑफ हेसे (१८७२-१९१८) ही इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाची आवडती नात होती. निकोलस (१८६८-१९१८) हा रशियन सिहांसनाचा वारसदार होता. दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र, दोघांच्या घरातून विरोध होता. पण, एलिक्स आणि निकोलस दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेड झालेले होते. 

वाचा ः ‘कंडोम’च्या विचित्र इतिहासाबद्दल तुम्हाला माहितीय का?

दोघांनी घरातील लोकांच्या विरोधात जाऊन लग्न केले. नंतर निकोलस हा झार निकोलन दुसरा अर्थात राजा झाला आणि एलिक्स ही महाराणी अलेक्झांड्रिया फियोडोरोव्हना झाली. एलिक्साने निकोलसा राज्य चालविण्यालाठी प्रोत्साहित केले. मात्र, एलिक्सामुळे निकोलसच्या राज्यात तीव्र असंतोष निर्माण झाला. 

वाचा ः सेक्स रॅकेट चालवत होत्या ‘या’ अभिनेत्री; पोलिसांनी छापा टाकताच सापडल्या लज्जास्पद अवस्थेत

निकोलस आणि एलिक्स या दोघांना एक मुलगा झाला. पण, त्याला हेमोफोलिया, या दुर्मिळ आजाराने ग्रासले. त्याच्यावर उपचार करण्यासाठी दोघे जण आपल्या मुलाला घेऊन एका कुविख्यात भिक्षू रासपुतीनकडे गेले. त्याच्या या कृतीमुळे रशिशन लोकांचा दुसरा निकोलसवर रोष वाढला. 

वाचा ः स्त्रीयांना ‘सेक्सचा क्लायमेक्स’ अनुभवता येतो का?

शेवटी ऑक्टोबर १९१७ मध्ये क्रांतीने जोर धरला आणि झार निकोलसला सत्ता सोडण्यास भाग पाडले. नंतर रशियावर साम्यवादी राज्यकर्ते बोल्शेविकांनी सत्ता स्थापन केली आणि १९१८ मध्ये सपूर्ण राजघराण्यालाच ठार केलेएकंदरित काय, निकोलस आणि एलिक्स यांचा सेक्सच झाला नसता, त्यांच्या मुलाला दुर्मिळ आजार झाला नसता, त्याने लोकशाही विचारांना पाठिंबा दिला असता, रशियन लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला असता आणि रशियाचं शितयुद्ध झालंच नसतं.

Wallis Simpson's marriage to Edward VIII was shockingly miserable

सिम्पसनच्या सेक्समुळे हिटलरचा अपेक्षाभंग झाला 

प्रिन्स एडवर्ड (१८९४-१९७२) इंग्लंडच्या राज्याचा वारसदार होता. तो १९३० मध्ये व्हॅली सिम्पसन (१८९६-१९८६) हिला भेटला. पण, तिने पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता. एडवर्ड तिच्या प्रेमात वेडा झाला होता. २० जानेवारी १९३६ रोजी एडवर्डला इंग्लंडची गादी मिळाली. तेव्हा तो एडवर्ड आठवा म्हणून राजा झाला. त्याला सिम्पसनशी लग्न करायचं होतं.

वाचा ः सेक्स करण्याची योग्य वेळ कोणती?

पण, ब्रिटनच्या पंतप्रधानांनी त्याला विरोध केला. कारण, तो घटस्फोटीत सिम्पसनशी विवाह करत होता. त्याने जगाला चकीत करणारी गोष्ट घडवून आणली. १० डिसेंबर १९३६ साली एडवर्ड आठवा याने सिम्पसनच्या प्रेमाखातर आपल्या राजेपदाचा त्याग केला आणि धाकटा भाऊ अल्बर्टला गादी सोपवली. त्यानंतर एका वर्षातच एडवर्ड आठवाने सिम्पसनशी लग्न केलं. लग्नानंतर दोघेही फ्रान्समध्ये राहिले आणि १९७२ मध्ये त्याचा मृत्यू झाला. 

वाचा ः ‘या’ माॅडेलचे सेक्सी फोटो पाहून इंटरनेटदेखील झाले हॅंग!

एडवर्ड आठवा हा नाझीवादी असलेल्या जर्मनीचा प्रशंसा करणारा होता. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीबरोबरच्या युद्धात इंग्लंडला एडवर्ड आठवा बाजूला ठेवेल, अशी आशा हिटलरला होती. एकंदरित काय, एडवर्ड आठवा याने सिम्पसनच्या प्रेमात आपलं राजेपद सोडलं नसतं, तर दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड कधीच उतरला नसता. आणि कदाचित नाझींनी अख्खा युरोप ताब्यात घेतला असता.

इतिहासातील अनेक गोष्टी आपल्याला धक्का देणाऱ्या असतात. वरील पाच गोष्टी पाहिल्या तर, त्यांना जगाचा इतिहासच बदलून गेला आहे. त्यामागे एकच कारण होते, ते म्हणजे सेक्स! एवढा मोठा जगाचा इतिहास जो बदलून गेला, त्याला आवडत्या व्यक्तीशी सेक्स करायला मिळावा हाच उद्देश होता. असो. त्यामुळे सेक्स ही गोष्ट इतिहास घडवणारी गोष्ट म्हणायला काही हरकत नाही.

Back to top button