Chinese sex racket : चिनी टोळ्यांचे पाकिस्तान, नेपाळमध्ये सेक्स रॅकेट; हिंदू, ख्रिस्ती मुलींची विक्री! | पुढारी

Chinese sex racket : चिनी टोळ्यांचे पाकिस्तान, नेपाळमध्ये सेक्स रॅकेट; हिंदू, ख्रिस्ती मुलींची विक्री!

इस्लामाबाद / काठमांडू; वृत्तसंस्था : पाकिस्तान तसेच नेपाळ या देशांतील राजकारणात चीनची ढवळाढवळ आहेच. या दोन्ही देशांतील समाजजीवनही चीनने गढूळ केले आहे. चीनमध्ये लैंगिक गुणोत्तरात कमालीचा बिघाड झाला आहे. स्त्रियांपेक्षा पुरुषांचे प्रमाण चीनमध्ये जास्त आहे. यातूनच चीनमधील लोक पाकिस्तान तसेच नेपाळमधील चिनी दबदब्याचा गैरवापर करून तेथील महिलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. चीन व पाकिस्तानातील काही टोळ्या अल्पसंख्याक हिंदू, ख्रिश्चन तरुणींची लैंगिक गुलाम म्हणून चीनमध्ये विक्री करत असल्याची माहितीही समोर आली आहे. (Chinese sex racket)

अमेरिकन राजनयिक सॅम्युएल ब्राऊनबॅक यांनी तसा उघड आरोप केला आहे. सॅम्युएल हे अमेरिकन प्रशासनातील धार्मिक स्वातंत्र्य विभागाचे अधिकारी आहेत. वर्षभरात लग्नाच्या नावाखाली 629 पाकिस्तानी मुली चिनी पुरुषांना विकण्यात आल्याचे उघडकीला आलेही होते. पोलिस तपासही सुरू झाला; पण चिनी कर्जाच्या खाली पुरते दबलेल्या पाक सरकारने दबाव आणून तो थांबविला आणि चिन्यांना चरण्यासाठी कुरण मोकळे करून दिले. एपी या वृत्तसंस्थेने यासंदर्भात विस्तृत वृत्तही दिले होते. चिन्यांच्या लैंगिक छळाच्या बळी ठरणार्‍या बहुतांश महिला या अन्य समुदायांच्या असल्याने आपल्याला काय फरक पडतो, अशीही तेथील सत्ताधार्‍यांची भूमिका आहे. नेपाळमध्ये प्रत्यक्षात सरकार या प्रकारांत सहभागी नसले तरी या देशांतही चिनी नागरिक महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे प्रकार अलीकडे समोर येऊ लागले आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये चिन्यांबद्दल त्यामुळे संतापाची भावना आहे. (Chinese sex racket)

चिनी आरोपीने 3 मुलींना डांबले, सतत बलात्कार (Chinese sex racket)

नेपाळमधील ललितपूर जिल्ह्यातील बुंगमती परिसरात भाड्याने घेतलेल्या एका घरातून 3 अल्पवयीन मुलींची नेपाळ पोलिसांनी मुक्तता केली आहे. एक मुलगी तर 13 वर्षांची आहे. फुजियान प्रांतातील यांग लीम इंग (वय 49) याने या तिन्ही मुलींना अनेक दिवसांपासून डांबून ठेवले होते. तिन्ही मुलींवर त्याने बलात्कार केल्याचे बुधवारी वैद्यकीय तपासणीतून समोर आले आहे. मुलींच्या कुटुंबीयांनी ‘त्या’ बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती.

अधिक वाचा :

Back to top button