‘सेक्स कोणासोबत करणार हे पोलिसांना २४ तासांपूर्वी सांगा’, त्या कोर्टाचा अजब निर्णय | पुढारी

'सेक्स कोणासोबत करणार हे पोलिसांना २४ तासांपूर्वी सांगा', त्या कोर्टाचा अजब निर्णय

लंडन : पुढारी ऑनलाईन

सेक्स हा शब्द आपल्या कानावर पडला तरी माणुस लाजतो. कधी कधी सेक्स हा शब्द सर्वाजनिक ठिकाणी कुणी उच्चारला तरी गुन्हा केल्यासारखे त्या व्यक्तीकडे पाहिले जाते. मात्र, एका देशात न्यायालयाने अजब निर्णय दिला आहे. सेक्स कोणासोबत करणार हे पोलिसांना सांगणं बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर त्याची माहिती ही पोलिसांना २४ तासांपूर्वी सांगा असे (Labourer must tell police he’s going to have sex 24 hours beforehand) देखील म्हटले आहे. 

वाचा:सांगली : हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, पोलीस निरीक्षकास अटक

युनायटेड किंग्डममधील न्यायालयाने एका प्रकरणामध्ये आरोपीला एक विचित्र अट घातली आहे. लैंगिक शोषणाचा आरोप असणाऱ्या या व्यक्तीला महिलांपासून दूर ठेवण्यासाठी न्यायालयाने एक विचित्र अट या व्यक्तीला घातली आहे. या व्यक्तीला कोणत्याही महिलेसोबत शरीरसंबंध ठेवण्याच्या २४ तास आधी त्यासंदर्भातील माहिती पोलिसांना द्यावी लागेल.

त्या व्यक्तीचे नाव डीन डेअर असून तो एक बांधकाम कामगार आहे. डेअर याच्यावर आतापर्यंत अनेक महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला शिक्षा म्हणून न्यायालयाने त्याच्यावर अनेक निर्बंध लादले आहे. दैनंदिन कामासाठी आवश्यक असेल तरच महिलांशी संवाद साधावा असे न्यायालयाने म्हटले आहे. 

वाचा:तीळाचा वापर खाण्यात करा आणि बदल पहा!

 तसेच मिळालेल्या माहितीनुसार, डीनला सेक्स करण्याची इच्छा झाल्यास त्याने आपल्या महिला जोडीदाराला आणि चारिंग क्रॉस पोलीस स्थानकामध्ये यासंदर्भात २४ तासआधी कळवणे बंधनकारक असणार आहे असेही न्यायालयाने म्हटले आहे.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेनुसार, न्यायालयाने डीन विरोधात सेक्शुअल रिस्क ऑर्डर जारी केली आहे. म्हणजेच एखाद्या लैंगिक अत्याचार किंवा छेडछाडीच्या प्रकरणामध्ये आरोप सिद्ध झाले नाही तरी अशा व्यक्तींकडून पुन्हा असे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Back to top button