गर्लफ्रेंड शोधूनही मिळेना?, हे AI टूल तुमचे स्वप्न साकार करेल, जाणून घ्या त्याविषयी | पुढारी

गर्लफ्रेंड शोधूनही मिळेना?, हे AI टूल तुमचे स्वप्न साकार करेल, जाणून घ्या त्याविषयी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बहुतेक लोक लग्नाबद्दल संभ्रमात असतात की, त्यांचा जोडीदार कसा असेल. तुम्हाला पाहिजे तसा जोडीदार शोधणे सध्या कठीणच आहे. परंतु जर तुम्हाला सांगितले की, तुम्ही तुमच्या स्वप्नातील जोडीदाराची रचना करू शकता तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. सुरुवातीला हे स्वप्नच वाटेल. पण एआय तंत्रज्ञानामुळे ही कल्पनाही प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. लवकरच, तुम्हाला AI च्या मदतीने तुमचा जोडीदार डिझाइन करण्याची संधी मिळू शकेल.

एआयच्या मदतीने परफेक्ट पार्टनर तयार करणे आता शक्य होणार आहे. सिलिकॉन व्हॅलीमध्ये असलेल्या Andreessen Horowitz (a16z) नावाच्या कंपनीने AI च्या मदतीने तुमचा परफेक्ट पार्टनर कसा तयार करू शकता, याबाबत GitHub वर माहिती शेअर केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, तुमच्या पार्टनरची बॅकस्टोरी लिहून आणि एआय मॉडेल निवडून तुम्ही त्याला तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता. सध्या डेव्हलपर्ससाठी हा एक प्रयोग असला तरी अनेक टेक्नॉलॉजी लव्हर्स त्यांच्या AI जोडीदाराच्या कल्पनेने आधीच उत्साहित आहेत.

या प्रोजेक्टमध्ये एव्हलिन नावाची एक AI मुलगी आहे. तिची सर्कसमध्ये काम करण्यापासून ते स्पेस स्टेशनला भेट देण्यापर्यंतची बॅकस्टोरी आहे. यूजर्स पूर्व-डिझाइन केलेल्या पर्सनॅलिटीमधून देखील निवडू शकतात, जसे की अॅलेक्स जो साहसी आहे, सेबॅस्टियन जो एक लेखक किंवा कॉर्गी आहे. यापैकी कोणताही पर्याय तुमच्या पसंतीस उतरला नाही, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या विचारांशी आणि गुणांशी मिळताजुळता जोडीदार बनवू शकता.

अँड्रीसेन होरोविट्झ या कंपनीने असेही म्हटले आहे की, काही लोक रोमँटिक संबंध शोधण्यासाठी एआयचा वापर करू शकतात. ते त्यांच्या चॅटबॉटसाठी संभाव्य वापरांपैकी एक म्हणून “रोमँटिक एआय गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड” चा उल्लेख करतात. काहींना DIY AI रोमान्सची कल्पना थोडी विचित्र वाटू शकते. परंतु अँड्रीसेन होरोविट्झला त्यात एक उपचारात्मक शक्ती दिसते. त्यांचा विश्वास आहे की चॅटबॉट्स आपल्याकडून शिकू शकतात आणि योग्य मेमरी थेरपिस्टप्रमाणे वागून स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करू शकतात.

डिजिटल पार्टनर हे आकर्षक वाटत असले तरी हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की, वास्तविक रोमान्ससाठी भावनिक संबंध आवश्यक असतो. जरी एआय तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असले तरी ते अद्याप मानवी नातेसंबंधांची जागा घेऊ शकत नाही. तरीसुद्धा, AI च्या जलद प्रगतीसह ऑल-डिजिटल रोमान्सचे आकर्षण वाढत राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

Back to top button