मेंदू ‘वाचणारी’ न्यूरो टेक्नॉलॉजी उपकरणे धोकादायक

मेंदू ‘वाचणारी’ न्यूरो टेक्नॉलॉजी उपकरणे धोकादायक

वॉशिंग्टन : आपल्या डोक्यात काय सुरू आहे हे जर कॉम्प्युटर त्याच्या स्क्रीनवर लिहित गेला तर? न्यूरो टेक्नॉलॉजी डिव्हाईस म्हणजेच मेंदू 'वाचणार्‍या' उपकरणांमुळे हे शक्य आहे. कोण कसला विचार करीत आहे हे यामुळे समजू शकते. हे जरी ऐकण्यात बरे वाटत असले तरी ते तितकेच धोकादायक आहे. अशा प्रकारच्या उपकरणांची जगात संख्या वाढत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर या प्रकारचा कायदा करून नियमन केले नाही तर मानवतेसाठी विशेषतः मानवाच्या खासगीपणासाठी धोकादायक ठरू शकते.

कोलंबिया विद्यापीठाचे न्यूरो सायंटिस्ट राफेल यूस्ते यांनी न्यूरोफाईटस् फाऊंडेशनची स्थापना केली आहे. त्यांनी सांगितले की अठरा कंपन्या आपल्या ग्राहकांना त्यांच्या मेंदूचा डेटा मिळवण्याचा पूर्ण अधिकार आपल्याला देण्यासाठी जबरदस्ती करीत आहेत. त्यापैकी एक कंपनी तर हा डेटा अन्य तिसर्‍याला देण्याचा अधिकारही घेते. न्यूरो टेक्नॉलॉजीवर देशांच्या सरकारांचे लक्ष नसल्याने हे सर्व घडत आहे आणि वेगाने हा उद्योग स्वतःला वाटेल ते करीत आहे. यावर आताच नियंत्रण ठेवले नाही तर भविष्यात ते मानवी मेंदूलाही ताब्यात ठेवून त्याच्यावर नियंत्रण करू लागतील.

बड्या न्यूरो टेक्नॉलॉजिकल कंपन्यांपासून स्टार्टअपपर्यंत अनेक कंपन्या विशेष स्वरूपाचे हेडसेटस्, इयरबडस्, मनगटावर बांधले जाणारे बँड बनवत आहेत. ही सर्व उपकरणे खास मेंदूच्या हालचाली रेकॉर्ड करण्यासाठी बनवली जात आहेत. जगभरात न्यूरो टेक्नॉलॉजीशी संबंधित पेटंट 2015 पासून 2020 पर्यंतच्या पाच वर्षांत दुप्पट झाले आहेत. सध्या जगभरात न्यूरो टेक्नॉलॉजीचा व्यवसाय 2.70 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news