UAE : भारतीय वंशाच्या नागरिकाला UAE चा पहिला मेगा पुरस्कार; आता दर महिन्याला मिळणार इतके लाख रूपये | पुढारी

UAE : भारतीय वंशाच्या नागरिकाला UAE चा पहिला मेगा पुरस्कार; आता दर महिन्याला मिळणार इतके लाख रूपये

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय वंशाचा वास्तुविशारद UAE मधील नवीन मेगा पुरस्काराचा पहिला विजेता ठरला आहे. मुळचे उत्तर प्रदेश येथील मोहम्मद आदिल खान सध्या वास्तुविशारद म्हणून दुबईत काम करतात. या पुरस्कारानंतर त्याला आता पुढील २५ वर्षे दरमहा ५.५ लाख रुपये दिले जातील.

परदेशी मीडियानुसार, गुरुवारी एका पत्रकार परिषदेत मोहम्मद खानला फास्ट फाइव्ह ड्रॉच्या मेगा बक्षीसाचे विजेते म्हणून नाव घोषित करण्यात आले. मोहम्मद हा दुबईतील एका रिअल इस्टेट कंपनीसाठी इंटीरियर डिझाइन सल्लागार म्हणून काम करतो. बक्षीस म्हणून त्यांला यापुढे २५ वर्षे प्रत्येक महिन्याला २५ हजार दिरहम म्हणजेच ५ लाख ५९ हजार ८२२ रुपये मिळतील.

खान यांने पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तो म्हणला की, “माझ्या कुटुंबात मी एकमेव कमावती व्यक्ती आहे. माझ्या भावाचा कोरोना दरम्यान मृत्यू झाला. आता त्याच्या कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारीही माझ्या डोक्यावर येऊन पडली आहे. माझे आई-वडील आणि पाच वर्षांची मुलगी आहे. विजयामुळे मी खूप आनंदी आहे. माझ्या घरच्यांचा यावर विश्वास बसत नव्हता.”

एमिरेट्स ड्रॉचे आयोजक पॉल चाडर म्हणाले की, “आठ आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत फास्ट-फाइव्हसाठी प्रथम विजेते घोषित केले आहेत. आम्ही त्याला फास्ट-फाइव्ह म्हणतो कारण, तो सर्वात वेगवान आहे. करोडपती होण्याचा हा एक मार्ग आहे.”

हेही वाचा : 

Back to top button