Oppenheimer Controversy : ओपेनहायमर-भगवद्गीता वादानंतर ‘तो’ सीन हटवणार | पुढारी

Oppenheimer Controversy : ओपेनहायमर-भगवद्गीता वादानंतर 'तो' सीन हटवणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ख्रिस्तोफर नोलनचा ओपेनहायमर जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करत आहे. भारतात ओपेनहायमरने बार्बीपेक्षा चांगले प्रदर्शन केले आहे. (Oppenheimer Controversy) पण, एका लव्हमेकिंग सीक्वेंस ज्यामध्ये मुख्य भूमिकेत सिलियन मर्फी और फ्लोरेंस पुघ आहेत, यांच्या आक्षेपार्ह सीनमुळे धुमाकूळ घातला आहे. (Oppenheimer Controversy)

या चित्रपटात ओपनहायमर यांची भूमिका अभिनेता सिलियन मर्फीने केली आहे. रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, मॅट डॅमन, एमिली ब्लंट, रामी मलिक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यामध्ये आहेत.

मर्फी-पुघ यांच्या एका दृश्यावेळी भगवत गीतेचे वाचन करताना दाखवण्यात आले आहे. भगवद्गीतेच्या श्लोकाचा वापर करण्यावरून वाद सुरू आहे. चित्रपट रिलीज आधी ही माहिती समोर आली, तेव्हा भूवया उंचावणारे हे दृश्य हटवले जातील. यानंतर काही लोकांनी यास विरोध करायला सुरुवात केली. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सीबीएफसीला खडसावल्याची माहिती समोर आलीय. सेन्सॉरने हे दृश्य वापरण्यास परवानगी दिलीच कशी असा सवाल ठाकुर यांनी विचारला. या आक्षेपार्ह दृश्यावर सीबीएफसीने उत्तर देण्याची मागणीदेखील केल्याची माहिती समोर आलीय.

ठाकुर यांनी चित्रपट निर्मात्यांना वादग्रस्त दृश्य हटवण्याचे निर्देश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकुर यांनी इशारा दिला आहे की, चित्रपटाच्या स्क्रीनिंगला मंजूरी देण्यात सहभागी असणाऱ्या सीबीएफसी सदस्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल.

Back to top button