मुंबई : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटांकडून आमदारांच्या पाठिंब्याचा दावा केला जात असतानाच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संभ्रम निर्माण झाला. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटाकडील अनेक आमदार सभागृहात अनुपस्थित असल्याने नेमके कोणाच्या बाजूने किती संख्याबळ आहे हे समजू शकलेले नाही. (Maharashtra Assembly Session)
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले. अधिवेशनाच्या दोन आठवड्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून अजित पवारांसह अनेक आमदार सत्तेत सहभागी झाले. सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार व शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असून अनेक आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला होता.
राष्ट्रवादीतील फुटीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून शह-काटशहाचे राजकारण सुरु झाले होते. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या ९ मंत्र्यांना वगळून उर्वरीत सर्व आमदारांची विरोधी बाकावर बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे केली होती.
अधिवेशनाचे कामकाज सुरु होताच पहिल्याच दिवशी अनेक आमदारांनी सभागृहात येणे टाळले. त्यामुळे कोणाच्या गटात किती आमदार होते, याबाबत पहिल्या दिवशी संभ्रम कायम राहिला. दरम्यान, अजित पवार गटाचे असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे मात्र विरोधी बाकावरील विरोधी पक्षनेत्यांच्या बाजूच्या जागेवर बसले होते. (Maharashtra Assembly Session)
शरद पवार समर्थक आमदार
१ – जयंत पाटील
२ – अनिल देशमुख
३ – बाळासाहेब पाटील
४ – राजेश टोपे
५ – प्राजक्त तनपुरे
६ – सुमन पाटील
७ – रोहित पवार
८ – मानसिंग नाईक
अजित पवार गट, नऊ मंत्र्यांसह
१ – बबन शिंदे
२ – इंद्रनील नाईक
३ – प्रकाश सोळंके
४ – किरण लहामटे
५ – सुनील शेळके
६ – सरोज अहिरे
हे ही वाचा :