Meta Microblogging App | Meta देणार Twitter ला टक्कर; लॉन्च केलं मायक्रोब्लॉगिंगसाठी ‘थ्रेड अ‍ॅप’; जाणून घ्या त्याविषयी

Threads App
Threads App
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यापासून अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. दरम्यान मेटाने देखील फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप या प्लॅटफॉर्मवर यूजर्सफ्रेंडली बदल करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान मेटाने ट्विटरला टक्कर देणारे मायक्रोब्लॉगिंग 'थ्रेड अ‍ॅप' (Threads App) नुकतेच लॉन्च केल्याची माहिती मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग (Meta Microblogging App) यांनी दिली आहे.

Twitter ने युजर्ससाठी अनेक बंधनं घातली आहेत. ट्विटरने घातलेल्या प्रतिबंधाप्रमाणे TweetDeck चा वापर करण्यासाठी व्हेरीफाईड अकाउंट असणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या युजर्सकडे ब्लू टिक नाही त्यांना ट्विटडेक वापरता येणार नाही. त्यामुळे मेटाने पावले उचलत मायक्रोब्लॉगिंगसाठी 'थ्रेड अ‍ॅप' (Threads App) लॉन्च केले आहे. हे अ‍ॅप आज (दि.६ जून) लॉन्च होताच, गेल्या तीन तासांत २० लाखांहून (Meta Microblogging App) अधिक जणांनी डाऊनलोड केले आहे.

Meta Microblogging App : 'थ्रेड अ‍ॅप' ची ही आहेत वैशिष्ट्ये

मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मसाठी 'थ्रेड अ‍ॅप' (Threads App) लॉन्च केले आहे. इंस्टाग्राम टीमनेच हे अ‍ॅप विकसित केले आहे. 'थ्रेड्स'मध्ये रिअल टाइम फीड देखील उपलब्ध असेल. थ्रेड्सची वैशिष्ट्ये आणि इंटरफेस ट्विटरसारखेच आहेत. थ्रेड्स एक मजकूर-आधारित सोशल मीडिया अ‍ॅप आहे, जे थेट एलन मस्क यांच्या ट्विटरशी स्पर्धा करते. 'थ्रेड अ‍ॅप' (Threads App) अ‍ॅपमध्ये युजर्संना ५०० शब्दांपर्यंत पोस्ट करण्याची मर्यादा प्राप्त होते. ज्यामध्ये वेब लिंक्स, फोटो (एकावेळी 10 फोटोंपर्यंत) आणि एक मिनिटापर्यंतचे व्हिडिओ समाविष्ट करून पोस्ट करण्याची परवानगी मिळते. थ्रेड्समध्ये तुम्ही एखाद्याला ब्लॉक आणि फॉलो देखील करू शकता. जर तुम्ही एखाद्याला इंस्टाग्रामवर ब्लॉक केले असेल, तर ते थ्रेड्सवरही ब्लॉक राहतील.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news