अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्‍ये गोळीबार, ४ ठार | पुढारी

अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्‍ये गोळीबार, ४ ठार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे माथेफिरुने केलेल्‍या गोळीबारात चार जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. हल्‍लेखाेराला ताब्‍यात घेण्‍यात आल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

फिलाडेल्फियामध्ये सोमवारी रात्री माथेफिरुने गोळीबार केला. यामध्‍ये चार जण जागीच ठार झाले तर चौघे जखमी झाले आहेत. या घटनेला फिलाडेल्‍फिया पोलिस विभागाच्‍या प्रवक्त्याने दिला आहे. यासंदर्भातील सविस्‍तर माहिती लवकरच दिली जाईल, असे पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे.

सोमवारी रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी गोळीबाराची घटना घडली. पोलिसांनी हल्‍लेखोराला पाठलाग करुन पकडले. मृतांमध्‍ये दोन तरुणांचा समावेश आहे. तर जखमी चौघांपैकी दोन मुलांची प्रकृती स्‍थिर आहे. या घटनेचा निषेध महापौर जिम केली यांनी ट्विटरच्‍या माध्‍यामातून केला.

हेही वाचा : 

 

 

Back to top button