Harish Magon Death : अभिनेते हरीश मगोन यांचे निधन, वयाच्या ७६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Harish Magon Death
Harish Magon Death

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'गोलमाल', 'नमक हलाल' आणि इन्कार अशा हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते हरीश मगोन यांचे निधन झाले. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. हरीश मगोन यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने सर्व सेलिब्रिटी आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत. हरीश यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. (Harish Magon Death)

CINTAA ने हरीश मागोन यांच्या निधनाच्या माहिती मिळताच शोक व्यक्त केला आहे. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (CINTAA) ने हरीश मागोन यांच्या निधनाची बातमी ट्विटरवर शेअर केली. पोस्टमध्ये लिहिले आहे, "CINTAA हरीश मागोन (जून 1988 पासून सदस्य) यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करते." (Harish Magon Death)

चित्रपट इतिहासकार पवन झा यांनीही हरीश मागोन यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर हरीश मागोन यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. १९७५ मध्ये आलेल्या आंधी चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले, "हरीश मागोन-यादों मधील हिंदी सिनेमातील त्या सुंदर कॅमिओसाठी नेहमीच लक्षात राहील. FTII ग्रॅज्युएट, तो गुलजारचा सहाय्यक मेराजचा जवळचा मित्र होता आणि त्यामुळे इथल्या आंधी गाण्यात ब्रेक घेण्यासाठी त्याला कॅमेऱ्याचा सामना करावा लागला." (Harish Magon Death)

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news