Manipur Violence : चिनी दुचाकींची मणिपूर हिंसाचाराला मोठी रसद! | पुढारी

Manipur Violence : चिनी दुचाकींची मणिपूर हिंसाचाराला मोठी रसद!

इंफाळ; वृत्तसंस्था : बंदी असलेली केनबो ही चिनी बनावटीची स्कुटी मणिपूरच्या हिंसाचाराचे एक मोठे कारण ठरली आहे. उखरूल, कमजाँग या हिंसाचारग्रस्त डोंगराळ जिल्ह्यांत या गाड्यांचा सर्रास वापर होतो. म्यानमारमधून शस्त्रे, शस्त्रांचे सुटे भाग या गाड्यांवरूनच आणले जात आहेत. (Manipur Violence)

125 सीसीच्या या गाडीला मेंटेनन्सची फारशी गरज नसते. 25 हजार रुपये तिची किंमत आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींमध्ये निम्म्यावर दुचाकी या केनबो आहेत. (Manipur Violence)

या दुचाकीवर भारतात बंदी असूनही म्यानमार सीमेलगतच्या उखरूल, कमजाँग, टेग्नोउपाल, चुराचंदपूर या जिल्ह्यांत पोलिसांनी त्या जप्त करण्याची मोहीम सुरू न केल्यामुळेच आज हिंसाचार आटोक्यात आणणे अडचणीचे ठरत आहे. मणिपूरच्या पूर्वेकडील भागात या गाड्यांचा वापर अफीमची ने-आण करण्यासाठीही केला जातो. (Manipur Violence)

चिनी गाडी भारतात येते कशी?

चीनच्या युनान प्रांतातून दुचाकीचे सुटे भाग थायलंडला येतात; मग म्यानमारमार्गे ते मणिपूरमध्ये पोहोचवले जातात. नंतर ते मणिपुरातच असेम्बल केले जातात (जुळणी केली जाते). उखरूल, कमजाँगमध्ये इतर भारतीय दुचाकी अपवादालाही दिसत नाहीत.

अधिक वाचा :

Back to top button