PM Modi US Visit | १५ वेळा स्टँडिंग ओवेशन, ७९ वेळा टाळ्यांचा कडकडाट, पीएम मोदींच्या भाषणाने US संसद दणाणली | पुढारी

PM Modi US Visit | १५ वेळा स्टँडिंग ओवेशन, ७९ वेळा टाळ्यांचा कडकडाट, पीएम मोदींच्या भाषणाने US संसद दणाणली

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi US Visit) यांनी गुरुवारी अमेरिकी काँग्रेसच्या (US Congress)
संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले आणि दोनदा असे संबोधित करणारे ते तिसरे जागतिक नेते ठरले. बराक ओबामा प्रशासनाच्या काळात २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींनी अमेरिकन काँग्रेसला संबोधित केले होते. पीएम मोदी (Prime Minister Narendra Modi) अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात संबोधित करताना उपस्थित सिनेटरांनी १५ वेळा स्टँडिंग ओवेशन दिले आणि ७९ वेळा टाळ्यांचा कडकडाट झाला. मोदी-मोदी असा नारा आणि टाळ्यांच्या कडकडाटाने अमेरिकन संसद दणाणून गेली.

पंतप्रधान मोदींचे अमेरिकन संसदेत भव्य स्वागत करण्यात आले.

पंतप्रधान मोदींनी हात उंचावून अभिवादन स्वीकारले.

पंतप्रधान मोदींनी अमेरिकन सिनेटर्सना ऑटोग्राफ दिले.

पीएम मोदींचे भारतीय- अमेरिका समुदायाने जोरदार स्वागत केले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • अमेरिकी काँग्रेसला संबोधित करणे हा नेहमीच मोठा सन्मान असतो. असे दोनदा संबोधित करणे हा एक अपवादात्मक विशेषाधिकार आहे. या सन्मानासाठी मी भारतातील १.४ अब्ज लोकांचे मनापासून आभार मानतो.
  • मला असे दिसले की तुमच्यापैकी जवळपास निम्मे २०१६ मध्ये इथे हजर होते. मी जुन्या मित्रांचा आणि उर्वरित निम्म्या नवीन मित्रांचा उत्साहदेखील पाहू शकतो.
  • सात वर्षापूर्वी मी येथे आलो तेव्हापासून बरेच काही बदलले आहे. पण भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री अधिक दृढ करण्याची आमची वचनबद्धता कायम आहे.
  • गेल्या काही वर्षांत AI – आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात प्रगती झाली आहे. त्याचवेळी आणखी एका AI (अमेरिका आणि भारत) मध्ये आणखी महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत.
  • आमची विश्वासार्ह द्विपक्षीय भागीदारी या नवीन पहाटेच्या सूर्यासारखी आहे जी सर्वत्र प्रकाश पसरवेल.
  • जेव्हा मी इथे २०१६ मध्ये आलो होतो, तेव्हा मी म्हणालो होतो की आमचे नाते भविष्यासाठी महत्त्वाचे आहे, ते भविष्य आज इथे आहे.
    जगातील दोन महान लोकशाही देश भारत आणि अमेरिका यांच्यातील दृढ संबंध साजरे करण्यासाठी आज तुम्ही एकत्र आल्याचे पाहून मला आनंद होत आहे.
  • प्राचीन काळापासून भारताला या मूल्यांचे वरदान लाभले आहे. एकत्रितपणे आपण जगाला एक चांगले भविष्य देऊ आणि भविष्यासाठी एक चांगले जग देऊ. लोकशाहीच्या भविष्यासाठी आमची भागीदारी चांगले संकेत आहेत.
  • भारत हे जगातील सर्व धर्मांचे माहेरघर आहे आणि आम्ही ते सर्व साजरे करतो. भारतात विविधता ही एक नैसर्गिक जीवनशैली आहे. आज जगाला भारताबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायचे आहे.
  • मी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा अमेरिकेला भेट दिली तेव्हा भारत ही जगातील दहावी मोठी अर्थव्यवस्था होती. आज भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. भारत लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. आपण फक्त मोठे होत नाही तर वेगाने वाढत आहोत. जेव्हा भारताची प्रगती होते तेव्हा संपूर्ण जगदेखील प्रगती करते.
  • आमच्याकडे सुमारे २,५०० राजकीय पक्ष आहेत. २० विविध राजकीय पक्ष देशातील विविध राज्यांत सत्तेवर आहेत. आमच्याकडे २२ अधिकृत भाषा आणि हजारो बोली आहेत, तरीही आम्ही एकाच आवाजात बोलतो.
  • गेल्या वर्षी भारताने स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी केली. प्रत्येक मैलाचा दगड महत्वाचा आहे पण हा एक खास होता. हजार वर्षांच्या परकीय राजवटीनंतरच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा एक उल्लेखनीय प्रवास आम्ही वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला. हा केवळ लोकशाहीचा उत्सव नव्हता तर विविधतेचाही उत्सव होता.
  • भारताचे ध्येय केवळ विकासाचे नाही ज्यामुळे महिलांना फायदा होईल. हा विकास महिलांच्या नेतृत्वाखालील आहे, जिथे महिला प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करतात.
  • युक्रेन संघर्षासह युद्ध युरोपमध्ये पुन्हा सुरु झाले आहे. परिणामी इथे प्रचंड वेदना आहेत. यात मोठ्या शक्तींचा समावेश असल्याने त्याचे परिणाम गंभीर आहेत.
  • ९/११ नंतर दोन दशके आणि मुंबईत २६/११ नंतर एक दशक उलटले तरीही कट्टरतावाद आणि दहशतवाद संपूर्ण जगासाठी धोक्याचा आहे.

 हे ही वाचा :

Back to top button