PM Modi Gifts : महाराष्ट्राचा गूळ, गुजरातचे मीठ…जाणून घ्या पीएम मोदींनी बायडेन दाम्पत्याला दिलेल्या ‘खास भेटवस्तू’ | पुढारी

PM Modi Gifts : महाराष्ट्राचा गूळ, गुजरातचे मीठ...जाणून घ्या पीएम मोदींनी बायडेन दाम्पत्याला दिलेल्या 'खास भेटवस्तू'

पुढारी ऑनलाईन डेस्क : दोन्ही देशांसाठी खास मानल्या जाणाऱ्या पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा आज दुसऱ्या टप्प्यात आहे. नरेंद्र मोदी यांनी वॉशिंग्टन डीसी येथील व्हाईट हाऊस येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना व्हाईट हाऊसमध्ये खास भेटवस्तू दिल्या आहेत. (PM Modi Gifts)

PM Modi Gifts : भेटवस्तूंमध्ये भारतातील ‘राज्यांची’ आहे झलक

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.२०) अमेरिकेला पोहोचले. अमेरिकेच्या लष्कराने बुधवारी (दि.२१) वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान मोदींना ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना व्हाईट हाऊसमध्ये खास भेटवस्तू दिल्या आहेत. त्यांना दिलेल्या सर्व भेटवस्तूंमध्ये भारताचे प्रतिबिंब दिसून आले आहे. यामध्ये पुढील भेटवस्तूंचा समावेश आहे.

कर-ए-कलमदानी हिरा

पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना एक हिरा भेट दिला आहे. पीएम मोदींनी जिल यांना ७.५ कॅरेटचा ग्रीन डायमंड दिला आहे. तो एका प्रयोगशाळेत विकसित करण्यात आला असून तो खूप खास आहे. याचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे हिरा पर्यावरणपूरक आहे. हा खास असा हिरवा हिरा कोणत्याही बॉक्समध्ये ठेवता येत नाही, तर त्यासाठी अतिशय सुंदर बॉक्स तयार करण्यात आला आहे. या बॉक्सचे नाव आहे ‘Papier Mache’.त्याला कर-ए-कलमदानी असेही म्हणतात. हा हिरवा हिरा समृद्धीचे प्रतीक आहे, त्याचबरोबर भारताच्या ७५ वर्षांच्या स्वातंत्र्याचे आणि शाश्वत आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्रतीक आहे.

खास चंदनाची पेटी

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना खास चंदनाची पेटी भेट दिली आहे. ही पेटी जयपूर येथील एका कारागिराने बनवली आहे. म्हैसूरमधून मिळवलेल्या चंदनाच्या लाकडात वनस्पती आणि इतर नमुने कोरलेले आहेत. त्याचबरोबर या बॉक्समध्ये अशा अनेक वस्तू आहेत, ज्या आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवतात.

PM Modi Gifts : श्री गणेशाची मूर्ती

भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना देशाच्या संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी त्यांना या खास भेटवस्तू दिल्या आहेत. त्यांनी श्री गणेशाची मूर्तीही दिली आहे. भगवान श्री गणेशाची मूर्ती एका बॉक्सच्या आत आहे. ही मूर्ती कोलकाता येथील चांदीच्या कारागिरांच्या पाचव्या पिढीतील कुटुंबाने तयार केली आहे. एवढेच नाही तर प्रत्येक घरात एक पवित्र स्थान असलेला तेल दिवा देखील देण्यात आला आहे. हा चांदीचा दिवा कोलकाता येथील पाचव्या पिढीतील चांदीच्या कारागिरांनी तयार केला आहे.

PM Modi Gifts : चांदीचे नाणे

पंतप्रधान मोदींनी ज्यो बायडेन यांना भेट दिलेल्या बॉक्समध्ये ९९.५ टक्के शुद्ध आणि हॉलमार्क असलेले चांदीचे नाणे दिले आहे. राजस्थानच्या कारागिरांनी त्याची सुंदर रचना केली आहे. हे चांदीचे उपहार म्हणून दिले जाते. लवणासाठी गुजरातचे मीठ दिले आहे.

पश्चिम बंगाल-चांदीचा नारळ

त्याच बरोबर मोदी यांनी दहा विशिष्ट पेटीत दहा देणग्या दिल्या आहेत. गाईच्या दानासाठी पश्चिम बंगालमधील कुशल कारागिरांनी हाताने तयार केलेला नाजूक चांदीचा नारळ गायीच्या जागी देण्यात आला आहे. म्हैसूर, कर्नाटक येथून मिळालेल्या चंदनाचा एक सुगंधी तुकडा  जमिनीच्या जागी दिला आहे. तमिळनाडूतून आणलेले पांढरे तीळ दिले आहे. याशिवाय, राजस्थानमध्ये हस्तनिर्मित, २४  कॅरेट शुद्ध आणि हॉलमार्क असलेले सोन्याचे नाणे हिरण्य उपहार म्हणून देण्यात आले आहे.

चार राज्यांची खास वैशिष्ट्ये असलेल्या भेटवस्तू 

पीएम मोदींनी आणखी एक भेट दिली आहे. त्यांनी चार स्वतंत्र पेट्या दिल्या आहेत. या प्रत्येक पेटीत खास वैशिष्ट्ये असलेल्या वस्तू आहेत. चार स्पेशल बॉक्सपैकी पहिल्या बॉक्समध्ये पंजाबचे तूप आहे, जे किती खास मानले जाते हे सर्वांनाच माहिती आहे. दुस-या बॉक्समध्ये हाताने विणलेले टेक्सचर टसर सिल्क फॅब्रिक झारखंडमधून आले आहे. तिसऱ्या क्रमांकावर उत्तराखंडचा लांब धान्य तांदूळ आणि याशिवाय चौथ्या पेटीत महाराष्ट्राच्या गुळाचा समावेश आहे.

‘द टेन प्रिन्सिपल उपनिषद’ च्या पहिल्या आवृत्तीची प्रत 

तसेच, १९३७ मध्ये, डब्ल्यूबी येट्स (WB Yeats) यांनी पुरोहित स्वामी यांच्या सह-लेखनात भारतीय उपनिषदांचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित केला. हा अनुवाद लंडनच्या फॅबर अँड फेबर लिमिटेडने प्रकाशित केला आणि युनिव्हर्सिटी प्रेस ग्लासगो येथे छापला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘द टेन प्रिन्सिपल उपनिषद’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीची प्रत राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना भेट दिली आहे.

हेही वाचा

Back to top button