Suchetana Bhattacharya : माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीने घेतला लिंग बदलण्याचा निर्णय; नेमकी कशी असते प्रक्रिया

कोलकाता; पुढारी ऑनलाईन : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुलगी सुचेतना भट्टाचार्य हिने लिंग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना ऑपरेशनद्वारे लिंग बदलून ‘सुचेतन’ बनायचे आहे, त्यासाठी त्यांनी कायदेशीर सल्लाही घेणे सुरू केले आहे. पुढील प्रक्रियेसाठी त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांशीही संपर्क साधला आहे. (Suchetana Bhattacharya)
सुचेतना या अलीकडेच एका LGBTQ कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी माध्यमांना सांगितले की, “मी उचलेल्या पावलाचा माझ्या आई-वडिलांची ओळखीशी किंवा कौटुंबाची ओळखीशी काहीही संबंध नाही. माझ्या LGBTQ चळवळीचा भाग म्हणून मी हे करत आहे. एक ट्रान्स-मॅन म्हणून मला दररोज होणारा सामाजिक छळ थांबवायचा आहे. (Suchetana Bhattacharya)
त्या पुढे म्हणाल्या, “मी प्रौढ आहे आणि आता मी ४१ वर्षांची आहे. परिणामी, मी माझ्या आयुष्याशी संबंधित सर्व निर्णय स्वतः घेऊ शकते. कृपया माझ्या पालकांना यात ओढू नका. पुरुष देखील मानसिकदृष्ट्या पुरुष आहेत, जसे मी स्वतःला मानसिकदृष्ट्या पुरुष समजते. मला आता शारीरिकदृष्ट्याही पुरुष व्हायचे आहे. (Suchetana Bhattacharya)
सुचेतना यांना विश्वास आहे की त्यांचे वडील त्यांच्या या निर्णयाचे स्वागत व कौतुक करतील कारण त्यांना सुचेतना यांच्या लहानपणापासूनच या विषयी माहिती आहे. (Suchetana Bhattacharya)
सुचेतना पुढे म्हणाल्या, “मी हा निर्णय घेतला आहे. मी लढेन माझ्यात ती हिंमत आहे. कोण काय म्हणतो याची मला पर्वा नाही. मी प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार आहे.
या बातमीचा विपर्यास करू नका, असे आवाहनही सुचेतना यांनी माध्यमांना केले आहे.
त्या म्हणतात, “हा निर्णय फक्त माझा आहे. या बातमीचा विपर्यास करू नका, असे मी सर्वांना आवाहन करेन. हा माझा स्वतःचा संघर्ष आहे. मला हे एकट्याने लढायचे आहे. कधीही न करण्यापेक्षा उशीर होणे चांगले. मला हे लहानपणापासूनच हवे होते. अनेकांनी त्याचे समर्थन केले आणि अनेकांनी विरोधसुद्धा केला. मानसिकदृष्ट्या मी एक ट्रान्स-मॅन आहे आणि शारीरिकदृष्ट्या मला असे व्हायचे आहे.
एलजीबीटीक्यू LGBTQ समुदायातील लोकांना धैर्याने जीवन जगण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्या म्हणाल्या, मी सगळ्यांना बोल्ड व्हायला सांगेन. कदाचित माझ्या आणि माझ्या आई-वडिलांच्या नावाबाबत काही वाद असेल. पण मी पुन्हा पुन्हा म्हणेन की कृपया समजून घ्या आणि प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे.
बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुलगी पर्यावरण कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून ओळखल्या जातात. मात्र, सुचेतना या सक्रिय राजकारणात कधीच दिसल्या नाहीत.
लोक लिंग बदल का करतात ?
लिंग बदलणे हे वाटते त्यापेक्षा कठीण आहे. लोक अशी शस्त्रक्रिया करून घेतात जेणेकरून त्यांचे शारीरिक स्वरूप त्यांच्या लिंग ओळखीशी जुळावे. लोक असे करतात कारण त्यांना लिंगाधारित भेदभाव लिंग ओळख विकार किंवा लिंग डिसफोरियाचा अनुभव येतो. जेंडर डिसफोरिया ही अशी स्थिती आहे जिथे स्त्रीला पुरुषासारखे वाटते आणि पुरुषाला स्त्रीसारखे वाटते. ज्या लोकांना जेंडर डिसफोरिया आहे, ते अशा प्रकारचे ऑपरेशन करून घेतात.
लिंग बदलणे हे वाटते त्यापेक्षा कठीण आहे. लोक अशी शस्त्रक्रिया करून घेतात जेणेकरून त्यांचे शारीरिक स्वरूप त्यांच्या लिंग ओळखीशी जुळावे. लोक असे करतात कारण त्यांचा जो सेक्स असतो त्याच्या विरुद्ध किंवा त्याच्या विपरीत त्यांची शरीर रचना व स्वभाव, संवेदना असतात. म्हणजे व्यक्ती जर स्त्री असेल तर तिचा पुरुषाचा स्वभाव व संवेदना असतात आणि जर व्यक्ती पुरुष असतेल तर त्याचा स्वभाव व संवेदाना स्त्री सारख्या असतात. या भिन्नतेमुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर (Gender Identity Disorder), जेंडर डिस्फोरिया (Gender Dysphoria), जेंड डिस्क्रीमिनेशन (Gender Discrimination) अशा कारणांमुळे लोक लिंग बदलाच्या प्रक्रियेला अर्थात लिंग बदलाच्या शस्त्रक्रिया सामोरे जातात.
अधिक वाचा :
- Gender Reassignment : कर्मचाऱ्यांना मिळणार लिंग बदलासाठी आर्थिक पाठबळ; भारतातील ‘या’ कंपनीचा मोठा निर्णय
- BJP Leader killed : छत्तीसगडमध्ये भाजप नेत्याची नक्षलवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या; मृतदेहावर निनावी पत्र
- योग कॉपीराईट, पेटंट आणि रॉयल्टी पेमेंटपासून मुक्त : पंतप्रधान नरेंद्र मोदी | International Day Of Yoga 2023 PM Modi