Sushma Andhare News | सुषमा अंधारेंना मारहाण केल्याचा दावा पडला महागात, ठाकरेंकडून संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांची पक्षातून हकालपट्टी | पुढारी

Sushma Andhare News | सुषमा अंधारेंना मारहाण केल्याचा दावा पडला महागात, ठाकरेंकडून संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांची पक्षातून हकालपट्टी

बीड ; पुढारी वृत्तसेवा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना दोन चापटा मारल्याचा दावा करणारे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव व बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बीड येथे झालेल्या राड्यानंतर पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी ही तडकाफडकी कारवाई केली. (Sushma Andhare News)

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने राज्यभर काढण्यात असलेल्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप बीड येथे शनिवारी (दी.20) होत आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून, गुरुवारी सायंकाळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे व स्थानिक नेते सभा स्थळाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी छोट्याशा कारणावरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात वाद झाला. दरम्यान यावेळी उपनेते सुषमा अंधारे यांनाही धक्काबुक्की झाल्याचे समजते.

या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी आप्पा जाधव यांची गाडीही फोडली. शिवसैनिकांचा राग अनावर झाल्याचे पाहून आप्पासाहेब जाधव यांनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान काही वृत्तवाहिन्यांना प्रतिक्रिया देताना आप्पा जाधव यांनी आपण उपनेत्या सुषमा अंधारे यांना दोन चापट मारल्याचे तसेच त्या पैसे मागत असल्याचा आरोप केला होता. या सर्व राड्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव व जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून तडका फडकी हाकालपट्टी केली.

हेही वाचा : 

Back to top button