Suicide Bomber : भाजपच्‍या बड्या नेत्‍यावरील आत्‍मघाती हल्‍ल्‍याचा कट उघड : रशियात 'आयएस'चा दहशतवादी जेरबंद | पुढारी

Suicide Bomber : भाजपच्‍या बड्या नेत्‍यावरील आत्‍मघाती हल्‍ल्‍याचा कट उघड : रशियात 'आयएस'चा दहशतवादी जेरबंद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  दहशतवादी संघटना इस्‍लामिक स्‍टेटच्‍या (आयएस) एका दहशतवाद्‍याला रशियात जेरबंद करण्‍यात आले आहे. रशियाच्‍या सुरक्षा विभाग ‘एफएसबी’ने ही कारवाई केली. या दहशतवाद्‍याने एप्रिल ते जून महिन्‍यांच्‍या कालावधीत तुर्कीमध्‍ये प्रशिक्षण घेतले. यानंतर त्‍याला रशियाला पाठविण्‍यात आले. ( Suicide Bomber) तेथून त्‍याला भारतात पाठविण्‍याची तयारी करण्‍यात आली होती. भाजपच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यावर हल्‍ला करण्‍याचा कट त्‍याने रचला होता, अशी माहितीही समोर आली असल्‍याचे रशियाची वृत्तसंस्‍था स्पुत्निकने म्‍हटले आहे.

Suicide Bomber म्‍हणून विशेष प्रशिक्षण

‘एफएसबी’ने दिलेल्‍या माहितीनुसार, जेरबंद करण्‍यात आलेला दहशतवादी एप्रिल ते जून २०२२ या कालावधीमध्‍ये तुर्कीमध्‍ये होता. येथे त्‍याला ‘आत्‍मघाती ह्‍ल्‍लेखोर’ म्‍हणून विशेष प्रशिक्षण देण्‍यात आले. रशियातून तो भारतात जाणार होता.
आत्‍मघाती हल्‍ला घडवून आणून तो भाजपाच्‍या एका वरिष्‍ठ नेत्‍याच्‍या हत्‍येचा कट त्‍याने रचला होता.

जेरबंद करण्‍यात आलेल्‍या दहशतवाद्‍याचे नाव अद्‍याप उघड करण्‍यात आलेले नाही. तो सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून ‘आयएस’च्‍या संपर्कात आला होता. यानंतर त्‍याने ‘आयएस’साठी सर्वस्‍व देण्‍याची शपथ घेतली. त्‍यानंतर त्‍याला आत्‍मघाती हल्‍लेखोराचे प्रशिक्षण देण्‍यात आले. मॉस्‍कोमधून त्‍याला भारतात पाठविण्‍याचे नियोजन होते. मात्र त्‍यापूर्वी त्‍याला अटक करण्‍यात ‘एफएसबी’ला यश आले.

गुप्‍तचर विभागाने दिला होता अलर्ट

भारतीय गुप्‍तचर विभागाने नुकताच इशारा दिला होता की, पाकिस्‍तानची गुप्‍तचर संघटना चंदीगढ आणि मोहालीमध्‍ये दहशतवादी हल्‍ला करण्‍याच्‍या तयारीत आहे. केंद्र सरकारने इस्लामिक स्टेट आणि त्‍याचे समर्थन करणार्‍या संघटनांना आणि मित्रांना भारतातील प्रतिबंधित दहशतवादी संघटना घोषित केले आहे. गृह मंत्रालयाने स्‍पष्‍ट केले आहे की, ‘आयएस’ सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून आपले विचार पसरवत आहे.

हेही वाचा : 

 

 

 

 

 

 

Back to top button