Children Recruited into Rebel Army : दक्षिण कोलंबियात दोन वर्षांच्या मुलांचीही बंडखोर लष्करात भरती!

Children Recruited into Rebel Army : दक्षिण कोलंबियात दोन वर्षांच्या मुलांचीही बंडखोर लष्करात भरती!

बोगोटा; वृत्तसंस्था : विमान अपघातात आईच्या मृत्यूनंतर बचावलेल्या चारही मुलांनी अ‍ॅमेझॉनच्या घनदाट जंगलात 40 दिवस तग धरला. या चार भावंडांतील 13 वर्षांच्या मोठ्या बहिणीने दोन्ही भावंडांसह आपल्या वर्षभराच्या चिमुकल्या बहिणीलाही चमत्कारिकपणे जगविले. बालकांच्या जगभर चर्चित झालेल्या या शौर्यकथेला आता नवे वळण आले आहे. (Children Recruited into Rebel Army)

दक्षिण कोलंबियातील एका भागात रिव्होल्युशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया (आरएएफसी) या सशस्त्र बंडखोर गटाने ताबा मिळविलेला आहे. हा गट कुटुंबांपासून मुलांना वेगळे करतो आणि आपल्या गटात या मुलांची भरती करून त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देतो व पुढे बंडखोर बनवतो. आराराकुवा हे आमचे गाव या भागालगतच आहे. बंडखोर गटाची नजर आमच्या मुलांवर पडू नये म्हणून त्यांची आई या मुलांना दुसर्‍या एका शहरातील नातेवाईकांकडे सोडण्यासाठी विमानाने निघालेली होती, अशी माहिती या मुलांचे पिता मॅन्युएल रॅनोक यांनी दिली. बंडखोरांचा हा सशस्त्र गट त्यांच्या सैन्यात अगदी 2 वर्षांपर्यंत वयाच्या मुलांनाही भरती करून घेतो. (Children Recruited into Rebel Army)

आता बेपत्ता श्वानाचा शोध

मुलांच्या बचाव कार्यात सहभागी विल्सन हा श्वान पथकातील सदस्य आता अ‍ॅमेझॉनच्या जंगलात हरवला आहे. 70 जवान जंगलात त्याचा शोध घेत आहेत.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news