हैदराबाद; पुढारी ऑनलाईन : तेलंगणाच्या सायबराबाद पोलिसांनी 'कबाली' चित्रपटाचा निर्माता केपी चौधरी (KP Chowdary) याला अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. १३ जून रोजी चौधरी किस्मतपूर एक्स रोडजवळ ड्रग्जची तस्करी करत होता. त्याच्याकडून ९० पाऊचमध्ये ८२.७५ ग्रॅम कोकेन ड्रग्ज आणि दोन लाखांहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी राजेंद्र नगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kabali Film Producer KP Chowdary)
सायबराबाद पोलिसांनी सांगितले की, आरोपी सुंकारा कृष्ण प्रसाद चौधरी हा खम्मम जिल्ह्यातील बोनाकल मंडलचा रहिवासी आहे. त्याने बी.टेक मेकॅनिकल मधून शिक्षण पूर्ण केले आणि नंतर महाराष्ट्रातील पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचालक म्हणून काम केले.
२०१६ मध्ये चौधरी यांनी नोकरी सोडून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. चित्रपट निर्माता म्हणून त्याने तेलुगू चित्रपट कबाली बनवला. केपीने दोन तेलुगु (सरदार गब्बर सिंग, सीतम्मा वक्तिलो सिरिमल्ले चेट्टू) आणि एक तमीळ (कनिथन) चित्रपट बनवले. पण या चित्रपटांमध्ये त्याला फारसा फायदा झाला नाही.
नायजेरियनकडून कोकेनचे खरेदी
या दरम्यान त्याचे चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींशी चांगले संबंध होते. त्यानंतर तो गोव्यात आला आणि त्याने गोव्यात ओएचएम क्लब सुरू केला. त्याच्या क्लबमध्ये येणाऱ्या मित्र आणि सेलिब्रिटींसोबत तो ड्रग्जचे सेवन करत असे. व्यवसायात तोटा झाल्यामुळे एप्रिल २०२३ मध्ये तो हैदराबादला परतला. येथे त्याने नायजेरियात राहणाऱ्या एका व्यक्तीकडून कोकेनचे १०० पाउच विकत घेतले आणि तो मित्रांना विकत होता. त्याला एसओटी माधापूरच्या पथकाने १३ जून रोजी अंमली पदार्थ तस्करीत अटक करण्यात आली.
केपी चौधरी यांच्याकडून काय मिळाले ?
अधिक वाचा :