

कोलकाता; पुढारी ऑनलाईन : कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Netaji Subhas Chandra Bose International Airport, Kolkata) डिपार्चर विभागात बुधवारी (दि.१४) रात्री भीषण आग (Fire Break Out) लागली. या वेळी आगीच्या भडक ज्वाला उठताना दिसत होत्या. तत्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली. (Fire Break Kolkata Airport)
मिळालेल्या माहितीनुसार, डिपार्चर सेक्शनमधील चेक-इन काउंटरजवळ ही आग लागली होती. यानंतर विभाग 3 डिपार्चरसाठी बंद करण्यात आला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र तपासानंतर नेमके कारण स्पष्ट होईल. या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेत कोणतीही मोठी हानी झालेली नाही. (Fire Break Kolkata Airport)
डिपार्चर लाउंजच्या डी पोर्टल परिसरात रात्री 9.10 वाजता ही आग लागली. D पोर्टल हे असे ठिकाण आहे जिथे प्रवाशांना बोर्डिंग पास मिळतात. यानंतर सुरक्षा चेकींगच्या काही भागालाही आग लागली. आग विझवण्यासाठी सुरुवातीला विमानतळाच्या आत असलेल्या इनबिल्ट फायर फायटिंग सिस्टिमचा वापर करण्यात आला, मात्र नंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. (Fire Break Kolkata Airport)
आग लागल्यानंतर अनेक प्रवासी आणि विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रथम बाहेर काढण्यात आले. विमानतळ संचालक सी पट्टाभी यांनी सांगितले की ते घटनास्थळी उपस्थित असून आग आटोक्यात आणण्यात आली आहे. कोणीही जखमी झाले नाही आणि आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अधिक वाचा :