नरेंद्र मोदी ‘इफेक्‍ट’ : ऑस्‍ट्रेलिया दौर्‍यानंतर सिडनीत खलिस्तान समर्थकांना झटका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्‍ट्रेलिया दौर्‍यात खलिस्‍तानी समर्थकांकडून ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्‍ट्रेलिया दौर्‍यात खलिस्‍तानी समर्थकांकडून ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला होता.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या ऑस्‍ट्रेलिया दौर्‍याचा सकारात्‍मक परिणाम आता दिसू लागले आहेत. सिडनी मेसोनिक सेंटरने खलिस्‍तान समर्थक शीख फॉर जस्‍टिस या वादग्रस्‍त संघटनेचा कार्यक्रम रद्द करण्‍याचे आदेश दिला आहे. ४ जून रोजी सिडनी मेसोनिक सेंटरमध्‍ये हा कार्यक्रम होणार होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्‍ट्रेलिया दौर्‍यात खलिस्‍तानी समर्थकांकडून ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. ( Khalistan Propaganda Event )

ऑस्‍ट्रेलियातील माध्‍यमांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शीख फॉर जस्‍टिस या वादग्रस्‍त संघटनेबाबत सातत्‍याने तक्रारी समोर येत होत्‍या. या संघटनेने ४ जून रोजी अशाच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र त्‍यावेळी सिडनी मेसोनिक सेंटरच्‍या व्‍यवस्‍थापनाला त्‍याचे स्‍वरुप समजले नव्‍हते. मात्र शीख फॉर जस्‍टिसच्‍या खलिस्‍तान प्रचाराचा पोस्‍टर्स आणि बॅनरमध्‍ये स्‍पष्‍टपणे दहशतवादी कारवायांचे समर्थन दिसत होते, या प्रकरणी ऑस्‍ट्रेलियातील भारतीय रहिवासी धर्मेंद्र यादव यांनी तक्रार दिली होती. त्यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले की, गेल्या पाच दिवसांपासून दररोज सकाळी हिंदूविरोधी घोषणा असलेले बॅनर पाहायला मिळत होते. यानंतर मेसोनिक सेंटरच्‍या व्‍यवस्‍थापनाने हा कार्यक्रम रद्‍द करण्‍याचे आदेश दिले. ( Khalistan Propaganda Event )

ऑस्‍ट्रेलियाच्‍या पंतप्रधानांनी दिले होते मोदींना कारवाईचे आश्‍वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताचा ऑस्ट्रेलिया दौरा केला आहे. यावेळी त्‍यांनी ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी 'भविष्यात अशा घटकांवर कडक कारवाई करू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले होते.

यावेळी अल्बानीज यांच्यासोबत संयुक्त निवेदन सादर करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि मी ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेले हल्ले आणि फुटीरतावादी घटकांच्या कारवायांवर यापूर्वीही चर्चा केली होती. आम्ही आजही या विषयावर चर्चा केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचे द्विपक्षीय संबंध मैत्रीपूर्ण आहेत. या संबंधांना बाधा पोहोचवणारी काही घटकांची कृती आम्ही सहन करणार नाही. पंतप्रधान अल्बानीज यांनी आज पुन्हा एकदा आश्वासन दिले की ते भविष्यातही अशा घटकांवर कठोर कारवाई करतील.

ऑस्ट्रेलियाच्या अनेक भागांमध्ये अलीकडेच खलिस्तानी समर्थक आणि भारत समर्थक निदर्शकांमधील संघर्षाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ऑस्ट्रेलियात नुकत्याच भारतीय झेंडे जाळण्याचे आणि एका हिंदू मंदिराचीही तोडफोड करण्याच्या घटना घडल्या आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या ऑस्‍ट्रेलिया दौर्‍यानंतर याची गंभीर दखल ऑस्‍ट्रेलिया सरकारने घेतल्‍याचे दिसत आहे. खलिस्‍तान समर्थक शिख फॉर जस्‍टिस या वादग्रस्‍त संघटनेचा कार्यक्रम रद्‍द करत ऑस्‍ट्रेलिया सरकारने कारवाई केली आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news