SCO Summit 2023 : एससीओ शिखर संमेलन ‘व्हर्च्युअल’ होणार; पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली 4 जुलैला परिषद

देशाला यशस्वी बनवण्याची शक्ती केवळ शिक्षणातच : पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाला यशस्वी बनवण्याची शक्ती केवळ शिक्षणातच : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : SCO Summit 2023 : एससीओ शिखर संमेलनाचे (शांघाय सहकारी संघटना) यजमानपद यावर्षी भारताकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 सप्टेंबर 2022 रोजी समरकंद शिखर संमेलनात 'शांघाय सहकारी संघटना'चे अध्यक्षपद ग्रहण केले होते. एससीओ परिषदेतील राष्ट्राध्यक्षांचे हे 22 वे शिखर संमेलन असणार आहे. जे 4 जुलाई 2023 रोजी व्हर्च्युअल स्वरुपात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे अध्यक्ष असणार आहेत. या समिटमध्ये सर्वच एससीओ सदस्य आभासी पद्धतीने सहभागी होतील.

या राष्ट्रांचे अध्यक्ष उपस्थित राहणार

या शिखर संमेलनात रशिया, चीन, कजाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उज्बेकिस्तान या राष्ट्रांना आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय ईराण, बेलारूस आणि मंगोलिया या राष्ट्रांना ऑब्जर्वर स्टेटच्या रुपात आमंत्रित केले आहे. याशिवाय अतिथी म्हणून तुर्कमेनिस्तानला आमंत्रित करण्यात आले आहे. या शिखर संमेलनात एससीओ बॉडीचे दोन प्रमुख-सचिवालय आणि एससीओ आरएटीएस उपस्थित राहतील. सहा आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांच्या प्रमुखांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये संयुक्त राष्ट्र, आसियान, CSTO, CICA, EAEU CIS यांचा समावेश आहे.

एससीओ संमेलनात भारताची भूमिका सकारात्मक आणि रचनात्मक

एससीओ शिखर संमेलनाचे यजमानपद भारताकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये 'SECURE' असे नाव दिले होते. त्यांनी सुरक्षेसाठी अर्थव्यवस्था आणि व्यापार, कनेक्टिव्हिटी, एकता, सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडतेप्रती सम्मान आणि पर्यावरण या सहा महत्वपूर्ण गोष्टींवर पावले उचलणे गरजेचे आहे, असे म्हटले होते.
याशिवाय आतापर्यंत भारताने SCO च्या अध्यक्षतेत सहयोगात नवीन स्तंभ स्थापित केले आहे. यामध्ये इनोवेशन, स्टार्टअप, पारंपारिक औषधे, डिजिटल समावेशन, युवा अधिकारिता, आदी महत्वपूर्ण विषयांवर कार्य केले आहे.

SCO चे भारताचे अध्यक्षपद हा सदस्य देशांमधील तीव्र क्रियाकलाप आणि परस्पर फायदेशीर सहकार्याचा काळ आहे. भारताने 14 मंत्रीस्तरीय बैठकांसह एकूण 134 बैठका आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भारत संघटनेत सकारात्मक आणि रचनात्मक भूमिका बजावण्यासाठी वचनबद्ध आहे आणि त्याच्या अध्यक्षतेखाली यशस्वी SCO शिखर परिषदेची वाट पाहत आहे.

चीन पाकिस्तानसोबतच्या तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्याचे आव्हान

गेल्या काही काळापासून भारताचे चीन आणि पाकिस्तानसोबतचे संबंधी तणावपूर्ण राहिले आहेत. G20 च्या काश्मीरमध्ये आयोजित बैठकीवर चीनकडून घालण्यात आलेला बहिष्कार तसेच सीमेवरील तणावपूर्ण संबंध त्याचप्रमाणे पाकिस्तानसोबतही असलेले तणावपूर्ण संबंध या दरम्यान एससीओची बैठक होत आहे. अशा परिस्थितीत भारतासमोर शिखर संमेलन परिषद हाताळण्याचे आवाहन आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news