Russia-Ukraine war : रशियाचा युक्रेनच्या शस्त्रास्त्र डेपोवर हल्ला

Russia-Ukraine war : रशियाचा युक्रेनच्या शस्त्रास्त्र डेपोवर हल्ला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  रशियाने युक्रेनमधील खमेलनित्स्की येथील शस्त्रास्त्र डेपोवर हल्ला केला आहे. युक्रेनचा ५० कोटींचा दारूगोळा नष्ट झाला असून, हल्ल्यानंतर परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अलीकडच्या काळात रशियाने युक्रेनवर केलेल्या मोठ्या हल्ल्यापैकी हा एक मोठा हल्ला आहे. (Russia-Ukraine war) रशिया-युक्रेन युद्धाला २४ फेब्रुवारी २०२२ राेजी सुरुवात झाली. हे युद्ध अजूनही धुमसतच असून ते अधिकाधिक धोकादायक बनत चालले आहे.

हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल

रशियाने युक्रेनच्या शस्त्रास्त्र डेपोवरील केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळ परिसरात लांब धुराचे लोट पसरत असल्याचे  व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, त्याचा आवाज दूरवर ऐकू आल्‍याचे परिसरातील लाेकांनी सांगितले. शनिवार, 13 मे रोजी युक्रेनने दोन रशियन लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर पाडली हाेती. एका रशियन वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार रशियाची ही विमानं युक्रेनच्या चेर्निहाइव्ह प्रदेशावर क्षेपणास्त्र आणि बॉम्ब हल्ला (Russia-Ukraine War) करणार होती. ईशान्य युक्रेनला लागून असलेल्या ब्रायन्स्क प्रदेशात Su-३४ लढाऊ विमान, Su-३५ लढाऊ विमान आणि दोन MI-८ हेलिकॉप्टर पाडण्यात आली आहेत. मात्र यावर अद्याप युक्रेनकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Russia-Ukraine war : रशियाचे युक्रेनवरील वाढते हल्ले 

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू होऊन १४ महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, दोन्ही देशांच्या लष्कराचे सुमारे लाखो जवान शहीद झाले आहेत. अलीकडेच रशियाने युक्रेनमधील बाखमुत प्रदेश ताब्यात घेण्यासाठी हल्ले तीव्र केले आहेत. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे बखमुत युक्रेनसाठी राजकीयदृष्ट्या खूप खास आहे, त्यामुळे जर त्यांनी बाखमुत प्रदेशवर कब्जा केला तर रशिया युद्धात आपली पकड मजबूत करतील, असा रशियन सैन्याच मत आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news