Imran Khan arrested | मोठी बातमी! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक | पुढारी

Imran Khan arrested | मोठी बातमी! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) प्रमुख
इम्रान खान (Imran Khan arrested) यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरून त्यांना रेंजर्सनी ताब्यात घेतले आहे. ‘अल कादिर ट्रस्ट भष्ट्राचार’ प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे, असे वृत्त पाकिस्‍तानमधील ‘डॉन न्यूज’ने दिले आहे.

इम्रान खान  इस्लामाबाद उच्च न्यायालयात हाेणार्‍या सुनावणीस हजर राहण्‍यासाठी आज (दि.०९) दुपारी आले होते. त्‍यांना न्‍यायालयाच्‍या परिसरातच रेंजर्सनी ताब्यात घेतले, अशी माहिती  इम्रान खानचे वकील फैसल चौधरी यांनी दिली आहे. न्यायालयात या आणि आम्हाला सांगा की, इम्रान खान यांना कोणत्‍या प्रकरणी अटक करण्‍यात आली आहे, अशी विचारणा इस्‍लामाबाद न्‍यायालयाचे मुख्‍य न्‍यायाधीश फारुख यांनी केली आहे.

इम्रान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात कलम १४४ (संचारबंदी) लागू करण्यात आले आहे. दरम्यान, इम्रान खान यांना अटक करताना धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ शेअर करत, पीटीआय पक्षाने इम्रान यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच इम्रान यांच्या वकिलाला देखील मारहाण झाल्याचा व्हिडिओ पीटीआय पक्षाच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. या घटनेनंतर पीटीआय पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, प्रमुख नेत्यांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.

कार्यकर्ते आक्रमक, पीटीआय पक्षाचे देशभरात निदर्शने करण्याचे आवाहन

इम्रान खान यांना अटक झाल्‍यानंतर पाकिस्तानमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. ‘पीटीआय’चे अझहर मशवानी यांनी इम्रान यांचे रेंजर्सनी  कोर्टाच्या आतून ‘अपहरण’ केल्‍याचा आरोप केला आहे.   देशभरात पीटीआयच्‍या कार्यकत्यार्त्यांनी निदर्शने करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे, असे ‘डॉन न्यूज’ने म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button