

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशमध्ये आज सकाळी (दि.५) भुकंपाचे सौम्य धक्के बसले. युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटरच्या (EMSC) माहितीनूसार या भूकंपाची तीव्रता ५.२ रिश्टर स्केलवर होती. भूकंप ३५ किमी (२१.७५ मैल) खोलीवर होता. आणि त्याचा केंद्रबिंदू ढाका विभागातील दोहर उपजिल्हाजवळ, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १० किमी खोलीवर असल्याचे सांगितले. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र भूकंपाच्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Earthquake)
अलिकडच्या काही दिवसांचा विचार करता बांग्लादेशमध्ये ५ डिसेंबर २०२२ रोजी ढाका आणि देशाच्या इतर भागांमध्ये रिश्टर स्केलवर ५.२ तीव्रतेचा मध्यम भूकंप झाला होता. तर यापूर्वी सर्वात मोठा भुकंप हा १८ जुलै १९१८ रोजी झाला होता, ज्याची तीव्रता ७.६ होती आणि त्याचा केंद्रबिंदू श्रीमंगल, मौलवीबाजार येथे होता.
हेही वाचा